नवी दिल्ली – कोरोनाच्या नव्या विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी येण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर सूरीनामचे अध्यक्ष चंद्रिका प्रसाद संतोखी हे उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात त्यांना आमंत्रण पाठविल्यानंतर आता उत्तरची प्रतिक्षा केली जात आहे. तथापि, सुरुवातीच्या चर्चेत सुरिनामच्या राष्ट्रपती कार्यालयाने संतोखीच्या उपस्थितीस सहमती दर्शविल्यामुळे त्यांना आमंत्रित केले गेले आहे. यापुर्वी जॉन्सन यांना प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमत्रंण दिले होते पण ब्रिटनमधील कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे त्यांनी भारत दौर्याबाबत असमर्थता दर्शविल्याबद्दल सरकारने खंत व्यक्त केली. यानंतर कोणत्याही प्रमुख अतिथीविना प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या कार्यक्रमावर चर्चा झाली. परंतु पुन्हा आता सूरीनामचे अध्यक्ष मुख्य पाहुणे बोलविण्यावर सहमती झाली.