रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आता हे निर्बंध जिल्ह्यात लागू राहणार

मार्च 27, 2021 | 5:18 pm
in स्थानिक बातम्या
0
jilhadhikari e1610382444398

कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने आज लागू केलेल्या आदेशातील निर्बंधासह जिल्हा प्रशासनाने ८ मार्च रोजी यापुर्वी लागू केलेले निर्बंध जिल्ह्यात लागू राहणार : जिल्हाधिकारी सूरज मांढरे
………….

नाशिक -करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने खबरदारी घेत ‘मिशन बिगन अगेन’ अंतर्गत लागू केलेल्या निर्बंधांसह जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यासाठी आठ मार्च रोजी जे निर्बंध लावलेले आहेत ते निर्बंधही कायम असतील.  त्यांचे पालन नागरिकांनी केले आणि पोलीस विभागाने कडक अंमलबजावणी केली तरच पुढील लॉक डाऊन टाळू शकू अशी माहिती  जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी  दिली आहे.

* जिल्हा प्रशासनाने ८ मार्च रोजी जारी केलेले निर्बंध –

– नाशिक व मालेगांव महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व  शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद राहतील. परंतु इ.10 वी आणि 12 वी बाबतीत पालकांच्या संमतीने उपस्थित राहतील.राष्ट्रीय, राज्य,विद्यापिठ,शासन,शिक्षण मंडळ स्तरावरील यापुर्वीच घोषित झालेल्या परीक्षा कोविड-19 विषयक सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन घेण्यास परवानगी देण्यात येणार आहे.

– जिल्ह्यातील  ग्रामीण भागातील नाशिक, नांदगांव, निफाड व मालेगांव या तालुक्यातील गतीने वाढता संसर्ग विचारात घेवुन सर्व शाळा, कॉलेजेस व कोचिंग क्लासेस 10 मार्च 2021 पासून पुढील आदेशापावेतो पुर्णपणे बंद करण्यात येत आहे. तसेच अन्य तालुक्यांचे बाबतीत परिस्थितीनुसार त्या-त्यावेळी निर्णय घेण्यात येईल.

– जिल्ह्यातील  सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 7 वाजेपर्यंत चालु राहतील. तसेच हे निर्बंध अत्यावश्यक सेवा,मनुष्य व प्राणीमात्रासाठी जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळे किराणा, दुध व वृत्तपत्रे वितरण याबाबींना लागू राहणार नाही. तसेच प्रत्येक शनिवार व रविवार या दिवशी अत्यावश्यव सेवा वगळता सर्व दुकाने पुर्णपणे बंद राहतील. तसेच नाशिक जिल्हयातील सर्व आठवडे बाजार बंद करण्यात येत आहे.

– तारीख 15 मार्च 2021 पासून लॉन्स, मंगल कार्यालय, हॉल्स व अन्य तत्सम ठिकाणी लग्न समारंभ व इतर कार्यक्रम आयोजित करणे पुढील आदेशापर्यंत पुर्णपणे बंद करण्यात आले आहेत. खाद्यगृहे, परमिट रुम, बार फक्त सकाळी 7 ते रात्री 09.00 या कालावधीत कोविड-19 चे मार्गदर्शक तत्वांचे यथोचित पालन करुन 50 टक्के टेबल्स क्षमतेने सुरु राहतील.

– जीम, व्यायामशाळा, स्पोर्टस कॉल्पलेक्स, खेळाची मैदाने, स्विमींग टँक हे वैयक्तीक सरावासाठी सुरु राहतील तथापी सामुहिक स्पर्धा/कार्यक्रम बंद राहतील. सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम/उत्सव, समारंभ पुर्णपणे बंद राहतील. सर्व प्रकारची धार्मिक स्थळे सकाळी 07.00 ते संध्याकाळी 07.00 वा. या वेळेत सुरु राहतील, धार्मिक विधी पाच व्यक्तीपेक्षा जास्त उपस्थिती राहणार नाहीत. शनिवार व रविवार या दिवशी उपरोक्त स्थळे पुर्णपणे बंद राहतील. भाजी बाजार 50 टक्के क्षमतेने सुरु राहील आणि एका आड एक याप्रमाणे ओटे सुरु राहतील.

– सर्व संबंधित विभागांनी कोरोना जनजागृती सप्ताह सुरु करुन जास्तीत जास्त प्रचार प्रसिध्दी करुन नागरिकांमध्ये कोविड-19 बाबतचे मार्गदर्शक सूचनांचे पालन करणेबाबत जनजागृती करावी.तसेच कोविड-19 बाबतीत शासनाच्या मार्गदर्शक सूचना जसे मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, हँण्ड सॅनिटाईझरचवापर इ. बंधनकारक राहील. सदर आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अणि संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग कायदा, 1897 आणि या संदर्भातील शासनाचे इतर अधिनियम व नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

लॉकडाऊन संदर्भात शासनाचे दिनांक 27 मार्च 2021 चे आदेशातील ठळक बाबी नाशिक जिल्ह्यात संदर्भात जारी केलेल्या मागील अधिसूचनेची सुसंगत करून पुढीलप्रमाणे आहेत:

– 27 मार्च 2021 पासून दररोज सायंकाळी 8 वाजेपासून ते सकाळी 7वाजेपर्यंत पाच पेक्षा अधिक व्यक्तींच्या जमाव करण्यास प्रतिबंध असेल.
– नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुकाने जिल्ह्याच्या अधिसूचनेनुसार सकाळी 07.00 ते रात्री 07.00 या वेळेतच उघडी राहतील. शासनाच्या या पूर्वीचे अधिसुचानेतील निर्देशानुसार सर्व अत्यावश्यक सेवा , मनुष्य व प्राणीमात्रा साठी जीवनावश्यक वस्तू , भाजीपाला , फळे , किराणा , दूध व वृत्तपत्रे वितरण या बाबींना यातून वगळणेत येत आहे .
– दिनांक 27 मार्च 2021 पासून सर्व सार्वजनिक स्थळे सायं. 08.00 वाजेपासून ते सकाळी 07.00  वाजेपर्यंत बंद राहतील. याबाबत उल्लंघन केल्यास 1000 रुपये प्रति व्यक्ती दंड करण्यात येईल .
– विना मास्क किंवा मास्कचा  योग्य वापर न करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध 500 रुपये दंड करण्यात येईल.
– सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1000 रुपयाचा दंड  करण्यात येईल .
– सर्व सिनेमा हॉल्स , मल्टिप्लेक्स ,मॉल्स,ऑडिटोरियम ,रेस्टॉरंट दिनांक 27 मार्च 2019 पासून रात्री 08.00 वाजेपासून ते सकाळी 07.00 वाजेपर्यंत बंद राहतील .तथापि होम डिलिव्हरी किचन , takeawayया बाबी रात्री 09.00 वा. पर्यंत चालू राहतील .या सर्व आस्थापनांच्या संदर्भात यापूर्वी कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण या बाबत दिलेले निर्देश जसे 50 टक्के उपस्थिती सामाजिक आंतर मास्क चा वापर या बाबी कायम राहतील
– सिनेमा हॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट मध्ये उपरोक्त नियमाचे भंग केल्यास covid-19 अधिसूचना अंमलबजावणी लागू असेपर्यंत सदरचे आस्थापना बंद केल्या जातील.
– सामाजिक सांस्कृतिक राजकीय धार्मिक जमाव किंवा कार्यक्रम घेण्यास मनाई असेल.
– आरोग्य आणि इतर अत्यावश्यक सेवा वगळून खाजगी अस्थापना 50 टक्के क्षमते पर्यंत सुरू राहतील तथापि covid-19 बाबत मार्गदर्शक  सूचनांचे पालन करून उद्योग क्षेत्रातील अस्थापना पूर्ण क्षमतेने सुरू राहतील .
– शासकीय कार्यालय मध्ये महत्त्वाचे व तातडीचे कामाशिवाय प्रवेश मिळणार नाही. बैठकीसाठी बोलविण्यात आलेल्या निमंत्रितांना संबंधित विभागाने पासेस देऊन प्रवेश घ्यावा.
– वरील दोन्हीही आदेशातील निर्बंधाबाबत काही संभ्रम निर्माण झाल्यास उपरोक्त दोन्हीही आदेशातील जे कठोरअसतील  ते  निर्बंध लागू राहतील .शासनाचे दि.27/03/2021 आणि या कार्यालयाचे दि.16/03/2021 चे आदेश सुलभ संदर्भासाठी या सोबत जोडलेले आहेत त्या प्रमाणे अवलोकन होवून  कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी सांगितले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पिंपळगाव बसवंत: विना मास्क कारवाई, ग्रामपालिकेतर्फे ७ हजाराचा दंड वसुल

Next Post

नाशिक – विमानात जागा न मिळाल्यामुळे बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
nashki airport

नाशिक - विमानात जागा न मिळाल्यामुळे बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011