नवी दिल्ली – विज्ञान-तंत्रज्ञान युगात नवनवीन शोध लागत असल्याने मानवाचे जीवन सुकर होत आहे. बाइक चालविताना अनेक अडचणींना तोंड दयावे लागते, वाहनावरील नियत्रंण सुटल्याने अनेकदा अपघात होतात. मात्र आता हेल्मेटच्या सहाय्याने बाईक कंट्रोल करता येणार आहे.
होंडा कंपनीच्यावतीने वाहनचालकांच्या सोयीसाठी नवनवीन तंत्रज्ञान आणण्यात येत आहे. होंडाने मोटारसायकलींवरील एक आश्चर्यकारक पेटंट दाखल केले आहे, ज्याद्वारे केवळ मानवी मनातील विचार करून वाहन अंशतः नियंत्रित केले जाऊ शकतात. त्याकरिता पेट्रोल, बॅटरी आणि हेल्मेट या कृत्रिम तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात येत आहे. यात सर्व बाईक्स मनाद्वारे नियंत्रित केल्या जातात, प्रथम मानवी मेंदू हा मोटरसायकलवर नियंत्रण ठेवणार्या शरीराच्या त्या भागावर सिग्नल पाठवितो. जो थेट मोटरसायकलच्या वर्तनावर परिणाम करतो. याचा अर्थ असा नाही की, जेव्हा मोटरसायकल स्वार उजवीकडे जाण्याचा विचार करतो, तेव्हा बाईक उजवीकडे वळते. होंडाचे हे नवीन तंत्रज्ञान बाइकच्या सेटिंग्ज प्रणालींमध्ये अंशतः बदल घडवून आणण्याविषयी आहे. न्यूरल सेन्सरसह प्रगत हेल्मेट तयार करण्यात येईल जे दुचाकीस्वारांच्या विचारांना सहजपणे समजून घेईल. दुचाकीचा ऑनबोर्ड संगणक हे संकेत पकडेल आणि मागणीनुसार आवश्यक सेटिंग समायोजित करेल. नवीनतम मल्टीस्ट्राडा व्ही ४ ही सक्रिय रडार प्रणाली बाजारात आणणारी पहिली बाईक आहे.