नाशिक – नाशिक जिल्ह्याच्या स्थापनेला यंदा १५१ वर्षे पूर्ण होत असल्याने त्यानिमित्त बहुविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीच हे कार्यक्रम होणार होते. मात्र, कोरोनामुळे ते स्थगित करावे लागले. आता मात्र, हे कार्यक्रम मोठ्या जोशात साजरे होणार असून त्यासंबंधीच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी यासंदर्भातील सर्व माहिती घेतली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी त्याची सविस्तर माहिती दिली. नाशिक हे १५१ व्या वर्षात पदार्पण करीत असून ही अभिमानाची बाब आहे. त्यामुळे पूर्वनियोजत सर्व कार्यक्रम शिस्तबद्ध साजरे व्हावेत, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.