औरंगाबाद – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येत्या ३० मार्चपासून शहरासह जिल्ह्यात १० दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू केला जाणार आहे. तसा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन झालेल्या बैठकीत कोरोनाचा आढावा घेण्यात आला. ३० मार्चच्या मध्यरात्रीपासून ८ मार्च पर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे औरंगाबाद हे पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू होणारे शहर ठरले आहे. केवळ अत्यावश्यक सेवा लॉकडाऊन काळात सुरू राहणार असून लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. दिवसाकाठी १५०० पेक्षा अधिक रुग्ण सापडत असल्याने लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.