नाशिक – येथील मोतीवाला एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट या प्रथितयश संस्थेच्या मोतीवाला काॅलेज ऑफ फिजीओथेरपी (बीपीटीएच) अभ्यासक्रमाचे महाविद्यालय नाशिक येथे विद्यमान शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यास राज्य शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. राज्य शासनाच्या प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या नीट युजी २०२० प्रवेश माहिती पुस्तिकेतील पृष्ठ क्रमांक ५२ च्या अनुक्रमांक २५८ मध्ये सदर महाविद्यालयाचा समावेश करण्यात आलेला असून महाविद्यालयाचा कोड क्रमांक ६१५७ आहे. विविध शैक्षणिक संस्था चालविणा-या व शैक्षणिक दर्जा टिकवून ठेवणा-या संस्थेकडून संचलित होणा-या मोतीवाला काॅलेज आॅफ फिजीओथेरपी (बीपीटीएच) नाशिक या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी महासीईटी पोर्टलवर प्राधान्य देण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्रवर्तक व संस्थेचे विश्वस्त डाॅ. फराज मोतीवाला व न्यासाचे व्यवस्थापकीय विश्वस्त डाॅ. एफ. एफ. मोतीवाला यांनी केले आहे.
मोतीवाला एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर ट्रस्ट
- डीएचएमएस. स्थापना – १९८९
- डाॅन ब्रेकर्स इंग्लिश मिडियम स्कुल स्थापना – १९९२
- बी.एच.एम.एस. स्थापना – १९९८
- बी.एड स्थापना – २००७
- एम.डी. होम स्थापना – २०१४
- मोतीवाला ज्युनिअर काॅलेज स्थापना – २०१८