नवी दिल्ली – आयटी हार्डवेअरच्या निर्मितीसाठी केंद्र सरकार गुंतवणूक योजना आणणार असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. सरकारच्या या योजनेमुळे लॅपटॉप, टॅब्लेट आणि पर्सनल कॉम्प्युटरचे उत्पादन वेगाने होईल, तसेच मोठ्या प्रमाणात मेड इन इंडिया टॅब लॅपटॉप आणि कॉम्प्युटर भारतातून निर्यात केले जातील.
मेड इन इंडिया लॅपटॉप, वैयक्तिक संगणक आणि टॅबलेट जगभरात वितरीत केले जातील. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत आयटी हार्डवेअर क्षेत्रासाठी 7,350 कोटी रुपयांच्या प्रॉडक्शन लिंक्ड प्रोत्साहन योजनेला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यासंबंधीची घोषणा केली आहे.