नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या मार्गावर भारतीय रेल्वे जोरदार वाटचाल करत आहे. त्यामुळे प्रवाश्यांसाठी रेल्वेने आणखी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. त्याद्वारे प्रवाशांना त्यांच्या सामानाची चिंता करायची गरज नाही. रेल्वे कर्मचारी प्रवाशांचे सामान थेट घरुन घेतील आणि रेल्वेतील आरक्षित आसनाच्या ठिकाणी आणून देतील. ही सेवा खरोखरच प्रवाशांना मोठा दिलासा देणार आहे.
रेल्वेने आपल्या प्रवाश्यांसाठी आगळीवेगळी सेवा आणली आहे, त्याअंतर्गत तुमचे सामान थेट घरून थेट ट्रेनच्या धक्क्यात नेला जाईल. रेल्वेच्या या सेवेला एंड टू एंड लगेज सर्व्हिस असे नाव देण्यात आले आहे. या सेवेची सुरुवात अहमदाबादमध्ये झाली आहे.
जास्त सामान नेणार्यांना मदत
पश्चिम रेल्वेच्या अधिकृत ट्विटर मधील एका ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, ‘पश्चिम रेल्वेने अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर बुकबॅग.कॉम द्वारा सामान आणि पार्सल सेवा सुरू केली. तसेच अन्य रेल्वे स्थानकांवर ही सेवा लवकरच उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. या सेवेमुळे प्रवासात अधिक सामान नेणार्या लोकांना मदत होईल. त्याचे शुल्क मालाच्या आकार आणि वजन यावर अवलंबून असेल.
ई-कॅटरिंग सेवा पुन्हा
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) पुढील महिन्यापासून ई-केटरिंग सेवा पुन्हा सुरू करणार आहे, त्यामुळे प्रवाश्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोविड -१९ साथीच्या रोगास सामोरे जाण्यासाठी लॉकडाउन लावल्यामुळे २२ मार्च २०२० रोजी ई-कॅटरिंग सेवा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र आता रेल्वे मंत्रालयाची परवानगी मिळाल्यानंतर आयआरसीटीसी फेब्रुवारीपासून टप्प्याटप्प्याने ई-कॅटरिंग सेवा पुन्हा सुरू करण्यास तयार आहे. सुरुवातीला सुमारे २५० रेल्वे गाड्यांसाठी सुमारे ३० रेल्वे स्थानकांवर सेवा सुरू केल्या जातील.
https://twitter.com/WesternRly/status/1354270280999288832