नाशिक – देशभर कोरोना (कोविड-१९) या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे या साथीच्या काळात भारत सरकारने करोना बरोबरची लढाई लढण्यासाठी पेन्शनर लोकांची जास्त काळजी घेण्यात आली आहे. त्यासाठी कर्मचारी भविष्य निधी योजेने अंतर्गत EPS – 95 सभासदासाठी EPFO ने “प्रयास” हि योजना सुरु केली आहे या योजेने अंतर्गत जो सभासद वयाची ५८ वर्ष पूर्ण करून सेवानिवृत होतो त्या सभासदास त्याच्या निवृत्त (रिटायर) होणाऱ्या दिवसाच्या आत त्याची पेन्शन चालू होणार व त्या दिवशी त्यास “पेन्शन पेमेंट ऑर्डर” मिळणार असल्याची माहिती क्षेत्रिय भविष्य निधी आयुक्त एम. अशरफ यांनी दिली.
या योजेने अंतर्गत सभासदास तो निवृत होण्याच्या आधी एक महिना त्याचा क्लेम फॉर्म कंपनीतर्फे भविष्य निधी कार्यालयात पाठवावा लागेल म्हणजे भविष्य निधी ऑफिस त्याचा पेन्शन फॉर्म सेटल करून पेन्शन पेमेंट ओर्डेर त्यास निवृतीच्या दिवसापर्यंत देईल. केंद्रीय भविष्य निधी आयुक्त , नवी दिल्ली यांनी या संदर्भात भारतातील १३५ क्षेत्रिय कार्यालयांना तसे आदेश देण्यात आले आहे भारत सरकारने हा एक ऐतिहासिक निर्णय पेन्शनर बाबत घेतला आहे. अशी माहिती अशरफ यांनी दिली. सर्व निवृत होणाऱ्या सभासदांनी या योजेनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.