नाशिक – संविधान सन्मानार्थ आयोजित विद्रोही साहित्य संमेलनास सहकार्य मिळणेबाबतचे पत्र विद्रोही साहित्य संमेलन चे मुख्य विश्वस्त ऍड. मनीष बस्ते यांच्या नेतृत्वाखाली १२ फेब्रुवारी रोजी मविप्र संस्थेस दिले होते. त्यास संस्थेने मान्यता देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती विद्रोही साहित्य संमेलनााच्या संयोजकांनी दिली आहे.. या निर्णयावर साहित्य संमेलन संयोजन समिती आभार व्यक्त केले आहे. छत्रपती शाहू महाराज व सत्यशोधक चळवळ चा वारसा असलेल्या संस्थेच्या प्रांगणात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हे पत्रही त्यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
श्रीमती नीलिमा ताई पवार यांनी पाठवलेल्या पत्रात म्हंटले आहे की,
१५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे संविधान सन्मानार्थ आयोजित करण्यात येत असल्याचे व या संमेलनासाठी म.वि.प्र. संस्थेचे सहकार्य करावे असे पत्र आपण व आपल्या सहकाऱ्यानी संस्थेला दिले आहे.
म.वि.प्र संस्था ही बहुजन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी स्थापन झालेली संस्था आहे. संस्थेने आजवर अनेक सांस्कृतिक-सामाजिक कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सक्रीय सहभाग घेतला आहे. संस्थेचे प्रमुख धुरीण दिवंगत सरचिटणीस कर्मवीर डॉ. वसंतरावजी पवार यांनी एक अभूतपूर्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात पुढाकार घेतला होता. हे सर्वश्रुत आहेच. विद्रोही मराठी साहित्य संमेलने ही म.फुलेंच्या मराठी साहित्यविषयक भुमिकेवर आयोजित करत असता हे महाराष्ट्राला ज्ञात आहेच.राजर्षि शाहू महाराजांनी उधोजी मराठा बोर्डींग व वंजारी वसतिगृहास (आजचे डोंगरे वसतिगृह)भेट दिल्याच्या घटनेस १०० वर्षे पूर्ण होत असल्याचे व विद्रोही आंबेडकरवादी साहित्यिक वामनदादा कर्डक , बाबुरावजी बागूल व कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतीचे औचित्य म्हणून १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन तुम्ही नाशिक मध्ये आयोजित करत आहात याचा मविप्रसह सर्वच नाशिककरांना विशेष आनंद वाटत आहे.
या विद्रोही च्या देशपाळीवरील सांस्कृतिक संमेलनासाठी संस्थेच्या मुख्य आवारातील कर्मवीर भाऊसाहेब हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयामागील मैदान मंडप उभारणीसाठी व इतर सहकार्य मागितले आहे .देशातील मान्यवर साहित्यिक, कलावंत,सहभागी होणार असलेल्या या ऐतिहासिक उपक्रमाचे स्वागत करत आहोत.संस्थेने आपल्या पत्रास सकारात्मक प्रतिसाद देत मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे .कोरोना महामारी संदर्भातील शासकीय धोरण व नियम पाळण्याच्या अटीसह ही मान्यता देण्यात येत आहे
वरील पत्र संस्थेने दिले आहे.”