शनिवार, सप्टेंबर 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आता ‘जेल पर्यटन’; स्वातंत्र्य लढ्याचे साक्षीदार असलेली कारागृहे पाहण्याची संधी

by Gautam Sancheti
जानेवारी 23, 2021 | 3:42 pm
in संमिश्र वार्ता
0
anil deshmukh pc

मुंबई – भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे साक्षीदार असलेली कारागृहे पाहण्यासाठी गृहविभागाद्वारे प्रथमच ‘जेल पर्यटन सुरु करण्यात येत आहे. दि.26 जानेवारी 2021 पासून येरवडा कारागृह पर्यटनासाठी खुले असेल. या प्रकल्पाचे उद्घाटन मंगळवारी 26 जानेवारी रोजी दुपारी 12.00 वाजता  मुख्यमंत्री व  उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रातील कारागृहांना अनन्य स्थान आहे, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान नेत्यांना ब्रिटीशांनी येरवडा कारागृहात तसेच इतर कारागृहांतही जसे की ठाणे, नाशिक, धुळे व रत्नागिरी येथे कैद करुन ठेवले होते. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, मोतीलाल नेहरु, पंडीत जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू, सुभाषचंद्र बोस या थोर नेत्यांना ब्रिटीशांनी येरवडा कारागृहात कैद करुन ठेवले होते. या थोर नेत्यांच्या कारावासाची ठिकाणे स्मारक म्हणून जतन करण्यात आलेली आहेत व ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी या थोर नेत्यांनी केलेल्या त्यागाचे स्मरण देत राहतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये प्रसिध्द असा पुणे करार झाला तो याच येरवडा कारागृहात गांधी यार्ड असलेल्या आंब्याच्या झाडाखाली झाला. त्या झाडाची सुध्दा योग्य प्रकारे देखभाल करण्यात येत आहे. इ.स. 1899 मध्ये चाफेकर बंधूंना येरवडा कारागृहातच फाशी देण्यात आली. तसेच जनरल वैद्य यांच्या हत्येप्रकरणी कुप्रसिध्द जिंदा व सुखा यांनासुध्दा येरवडा कारागृहातील वधस्तंभावर फाशी देण्यात आली आहे. दि. 26.11.2008 रोजीच्या मुंबई हल्ल्यातील कुप्रसिध्द अतिरेकी अजमल कसाबलासुध्दा याच कारागृहात फाशी देण्यात आली.

शाळा/कॉलेज/विद्यापीठ व शैक्षणिक आस्थापना तसेच नोंदणीकृत अशासकीय संस्थाना ही ऐतिहासिक ठिकाणे पाहता यावीत या दृष्टीकोनातून गृह विभाग याद्वारे प्रथमतःच ‘जेल पर्यटन’ सुरु करीत आहे. यामुळे विद्यार्थी आणि शैक्षणिक आस्थापना, अशासकीय संस्थाच्या प्रतिनिधींना भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आणि येरवडा कारागृहात घडलेल्या इतर ऐतिहासिक घटना पाहता व अनुभवता येतील. या ठिकाणी उल्लेख करणे प्रसंगोचित आहे की, कारागृहे ही समाजातील लोकांच्या प्रवेशासाठी मनाई असलेला भाग आहे.

पुरेशी दक्षता

हा पर्यटन उपक्रम राबविताना सुरक्षेचे उल्लंघन होणार नाही, तसेच अनिष्ट घटकांना प्रवेश मिळणार नाही याची कारागृह प्रशासन योग्य ती काळजी घेईल. तसेच कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर पुरेशी दक्षता घेतली जाईल.पर्यटकांना माहिती देण्यासाठी पर्यटन गाईड पुरविला जाईल. दररोज भेट देण्याच्या पर्यटकांची संख्या 50 पेक्षा जास्त असणार नाही. येरवडा कारागृहास पर्यटक म्हणून भेट देणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी त्यांच्या संस्थेच्या लेटरहेडवर अर्ज करताना पर्यटक म्हणून भेट देणाऱ्या व्यक्तींची नावे व मूलभूत तपशील याचा उल्लेख करणे आवश्यक राहिल.

सदरील अर्ज अधीक्षक येरवडा कारागृह यांच्या [email protected] किंवा [email protected] या मेलवर अथवा प्रत्यक्षपणे कारागृह येथे किमान सात दिवस अगोदर करावा. येरवडा कारागृहाचा संपर्क क्र.020-26682663/020-29702586 आहे. संपर्कासंदर्भात काही मुद्दा असल्यास भेट देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनी क्र.9823055177 यावर संपर्क साधावा. पर्यटक म्हणून भेट देणाऱ्या व्यक्तींनी आधार कार्ड, संस्थेचे ओळखपत्र किंवा पासपोर्ट यापैकी कोणताही दस्तऐवज सादर करुन ओळख सिद्ध करणे अपेक्षित आहे. कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ, बॅगेज, मोबाईल फोन, कॅमेरा, पाण्याची बाटली किंवा कोणतीही वस्तू कारागृहाच्या आतमध्ये नेता येणार नाही, याची नोंद घ्यावी. कारागृह प्रशासनाने फोटोग्राफी तसेच व्हीडिओग्राफीची व्यवस्था केलेली असून ते कारागृहातुन बाहेर पडल्यानंतर पुरविण्यात येईल. तथापि, कारागृह विभागाला अनिष्ट व्यक्तीस प्रवेश नाकारण्याचा अधिकार असेल.

तसेच ही योजना लवकरच महाराष्ट्रातील इतर कारागृहातही राबविण्यात येईल असे श्री. देशमुख यांनी सांगितले

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थ्यांचे नाशिक कट्टाचे २६ जानेवारीला उदघाटन

Next Post

अखेर ट्रॅक्टर परेडला पोलिसांची परवानगी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

ladki bahin 750x375 1
राज्य

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी संकेतस्थळावर e-KYC सुविधा सुरू….

सप्टेंबर 20, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
महत्त्वाच्या बातम्या

मोठा निर्णय….अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा परवानाच होणार निलंबित

सप्टेंबर 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना आरोग्याच्या तक्रारी भेडसावतील, जाणून घ्या, शनिवार, २० सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 19, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा मंत्री समिती गठीत…या सात मंत्र्यांचा समावेश

सप्टेंबर 19, 2025
IMG 20250919 WA0342 1
स्थानिक बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या अभियानात ७० हजारांचे उद्दिष्ट असतांना केली इतक्या झाडांची लागवड

सप्टेंबर 19, 2025
bbd creative
संमिश्र वार्ता

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये हे ५जी स्‍मार्टफोन सवलतीची दरात….

सप्टेंबर 19, 2025
IMG 20250919 WA0307 e1758286066150
स्थानिक बातम्या

एफडीएने नाशिकमध्ये १ लाख २५ हजारचा तुपाचा साठा केला जप्त…

सप्टेंबर 19, 2025
Untitled 29
संमिश्र वार्ता

पावसाळ्याच्या विश्रांतीनंतर चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुन्हा सुरु….

सप्टेंबर 19, 2025
Next Post
EsTR9JXW8AEDyNX

अखेर ट्रॅक्टर परेडला पोलिसांची परवानगी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011