नाशिक – केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नाशिक जिल्ह्यात ग्रामीण व शहरी विभागामध्ये तसेच कुष्ठरोग बाबत समस्या ग्रस्त भागात दिनांक १ डिसेंबर २०२० ते १६ डिसेंबर २०२० या कालावधीमध्ये सक्रीय कुष्ठ रुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहीम २०२० राबविण्यात येणार आहे. अभियानाचा मुख्य उद्देश समाजातील लपून राहिलेले कुष्ठरुग्ण ( हिडन लेप्रसी केस) लवकरात लवकर व बिना विकृती शोधून त्यांना त्वरित बहुविध औषध उपचार खाली आणणे गरजेचे आहे नवीन सर्गी कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचार या खाली आणून संसर्गाची साखळी खंडित करून रोगाचा होणारा प्रसार कमी करणे हे महत्त्वाचे आहे कुष्ठरोगाचे दुरीकरण ध्येय साध्य करून कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने वाटचाल करणे सदर अभियान हे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी कार्यक्षेत्रातील कुष्ठरोग व क्षयरोग बाबत समस्याग्रस्त भागात राबविण्यात येणार असून त्या भागातील सर्व घरांचे प्रशिक्षित आशा स्थानिक पुरुष स्वयंसेवक व आरोग्य सेवक यांचेमार्फत सर्वेक्षण करण्यात येत असून मार्गदर्शक सूचनांनुसार घरातील सर्व सभासदांची (दोन वर्षाखालील बालके वगळून) शरीराची तपासणी करण्यात येणार असून यामध्ये स्त्रियांची तपासणी अशांत मार्फत व पुरुष यांची तपासणी पुरुष स्वयंसेवक व आरोग्य सेवकांना मार्फत केली जाईल.
जिल्ह्यात ग्रामीण भागात व शहरी भागात तपासणी
नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात व शहरी भागात यामध्ये घरातील सर्व सदस्यांची तपासणी करण्यात येणार आहे याबाबत सर्व नागरिकांनी घरोघरी येणाऱ्या सर्वेक्षण टीम कडून कुष्ठरोग बाबत शारीरिक तपासणी करून घेणेबाबत सहकार्य करावे असे आव्हान नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कपिल आहेर, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ रवींद्र चौधरी यांनी केले आहे