नवी दिल्ली – सायबर गुन्हेगार कोणत्या तरी बहाण्याने वन टाइम पासवर्ड (ओटीपी) विचारून लोकांची बँक खाती साफ करीत होते, परंतु आता ते बँक ग्राहकाला ओटीपीला न विचारता देखील काही मिनिटात बँक खाते रिकामे करत आहेत. एवढेच नाही तर ते त्या संबंधित बँक ग्राहकाला अगोदरच कॉल करतात आणि त्यांचे खाते हॅक केले जात असल्याचे सांगतात. त्यानंतर काही सेकंदात खात्यात शून्य बॅलन्सचा मेसेजही मोबाइलवर येतो.
ओटीपी न सांगता सायबर गुन्हेगार कसे काय बँक खाते हॅक करत आहेत, हे शोधण्यात सायबर तज्ज्ञांना अद्याप यश आलेले नाही. सायबर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, फसवणुकीची ही नवी पद्धत याच महिन्यात सुरू झाली असून नुकत्याच अशा काही घटना घडल्या आहेत. या १५ दिवसातच सायबर पोलिस ठाण्यात अशी जवळपास सहा प्रकरणे नोंदली गेली आहेत. सायबर गुन्हेगार हे ग्राहकांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यापूर्वी किंवा नंतर त्यांच्या नंबरवर कॉल करतात आणि त्याबद्दल त्यांना माहिती देतात.
तसेच ते स्पष्टपणे सांगतात की, ते चोरटे असून त्यांनी त्या ग्राहकाचे खाते हॅक केले आहे. काही क्षणांत, जेव्हा संदेश मोबाइलवर झिरो बॅलेसचा मॅसेज पोहोचतो, तेव्हा लोकांना धक्का बसतो. ते त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवतात. या संदेशानंतर अनेक लोक गुन्हेगारांना त्यांचे पैसे परत देण्यासाठी विनंती करतात. मात्र येथूनच आणखी फसवणुकीचा खरा प्रकार सुरू होतो. काही पैसे परत करण्याचे भासवून गुन्हेगार त्याला ओटीपी नंबर मोबाईलवर देण्यास सांगतात. ओटीपीला सांगताच गुन्हेगारांचे काम पूर्ण होते, आणि खात्यातून काढलेली रक्कम गुन्हेगाराच्या खात्यात वर्ग केली जाते.
दरम्यान, ७ मार्च रोजी उत्तर प्रदेशामध्ये तैनात असलेल्या सैन्यातील जवानाला असाच अनुभव आला. बँक खाते हॅक करून त्याच्या खात्यातून सुमारे ३ लाख रुपये काढण्याचा संदेशही आला. मात्र सायबर पोलिसांच्या प्रयत्नातून पुन्हा संपूर्ण रक्कम मुकेशच्या खात्यावर पोहोचली.