आतापर्यंत तुम्ही जीमेलमध्ये ‘ओरिजिनल ‘ फोटो सेव्ह करण्याचे सेटिंग केले असेल तर ते १५ जीबीमध्ये धरले जातातच. High Quality with Unlimited Storage असे सेटिंग असेल तर ते १५ जीबी कक्षेपेक्षा बाहेर मानले जायचे. आता हे एक जून २०२१ पासून High Quality with limited Storage होणार आहे. समाधान एवढेच की ३१ मी २०२१ पर्यंत कितीही फोटो व विडिओ सेव्ह केलेत तरी ते १५ जीबीच्या कक्षेत येणार नाहीत. व नंतरही ते या मर्यादेत धरले जाणार नाहीत. या संदर्भात गुगलने सर्वाना मेल पाठवला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गूगल फोटोजमध्ये सध्या जगभरातून चार हजार अब्ज (४ Trilion ) इतके फोटो आणि विडिओ आहेत. यात दर आठवड्याला २८ अब्ज फोटोज आणि व्हिडिओची भर पडते. हे आकडे धडकी भागविणारे आहेत. हे फ्री storage गुगलच्या सर्व्हरवर आहे, पण त्याचा गुगलला आर्थिक फायदा काहीच नाही. म्हणूनच बहुदा गुगलने यावर ब्रेक लावायचे ठरवलेले दिसते.
तुमचे फोटो व विडिओ वाढत गेले की १५ जीबी कमी पडणार आणि तुम्हाला जादा स्टोरेज पैसे भरून घ्यावे लागणार. सध्याच्या दरांप्रमाणे १०० जीबीसाठी वर्षाला १३०० रुपये आकारले जातात. २०० जीबीसाठी २१००, दोन टीबीसाठी ६५०० आणि १० टीबीसाठी महिन्याला ३२५० रुपये मोजावे लागतात. यातला कोणता तरी प्लॅन घेण्याची तयारी करा अथवा, फोटो व विडिओ सेव्ह करण्यावर मर्यादा ठेवा. ! यापैकी काहीही केलेत तरी गूगलचाच फायदा आहे.
( जेष्ठ पत्रकार अशोक पानवलकर यांच्या ब्लाॅगमधून साभार )
https://netbhetonline.wordpress.com/2020/11/12/आता-गूगल-फोटोजसाठी-मोजा-प/