पुणे – गुडस सर्व्हिस टॅक्स (जीएसटी) मधील तरतुदींविरोधात आता कर सल्लागारांनी दंड थोपडले आहे. त्यामुळेच येत्या २९ जानेवारीला देशव्यापी आंदोलन करण्याची भूमिका कर सल्लागारांनी जाहीर केली आहे. देशभरातील जीएसटी कार्यालयांसमोर आंदोसन केले जाणार आहे. या आंदोलनात कर सल्लागार, व्यापारी, चार्टर्ड अकाऊंटंट आदी सहभागी होणार आहेत. जीएसटीतील अनेक जाचक तरतुदी आणि अटींमुळे तसेच संगणक प्रणालीमुळे असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात कर सल्लागार परिषदेने येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली. जाटक अटींमुळे व्यापारी, व्यावसायिक यांच्यासह कर सल्लागारही त्रस्त झाले आहेत. त्याची कुठलीही दखल सरकार घेत नाही. त्याला विरोध म्हणूनच हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आंदोलनाच्या दिवशी सर्व कर सल्लागार, सीए हे काळे कपडे परिधान करणार आहेत. तसेच, काळ्या फिती लावून काम करणार आहेत.