नाशिक – एबीबी इंडियाची ऑनलाइन बाजारपेठ देशभरात नावाजली जात असतांना त्यात आता लो व्होल्टेज मोटर्सची भर पडली आहे. एबीबी इंडियाने आपल्या ई-कॉमर्स मार्केटप्लेस, ईमार्टवर एलव्ही मोटर्सच्या लॉन्चिंग आणि यादीची घोषणा केली. हे भारतातील पहिल्या कंपनीमालकीचे ई-मार्केट प्लेस आहे. सुरवातीच्या टप्प्यात, एबीबीचा मोशन व्यवसाय ७५ केडब्ल्यू पर्यंतच्या मोटर्ससाठी मर्यादित होता.
अलिकडच्या काळात देशातील ई-कॉमर्स क्षेत्रात वेगाने वाढ झाली आहे. ई-कॉमर्स हे कंपन्यांसाठी आंतरिक वाहिनी म्हणून काम पाहत असते. यात टिकून राहण्यासाठी सखोल संशोधन केले जात असून ग्राहकांच्या विकसनशील गरजा भागवण्याकडे कल असल्याचे एबीबीचे मोशन बिझिनेसचे अध्यक्ष संजीव अरोरा यांनी सांगितले आहे. एलव्ही मोटर्सचा वापर भारतभरातील विविध उद्योग आणि प्रयोगांमध्ये केला जातो. ईमार्ट मोठ्या आणि छोट्या दोन्ही ग्राहकांना त्यांच्या गरजा भागविण्यासाठी उत्तम उत्पादनांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सहा हजार पेक्षा जास्त विद्युतीकरण उत्पादनांच्या यादीसह जुलै २०२० मध्ये हे ईमार्ट लाँच करण्यात आले होते. डेस्कटॉप तसेच मोबाइल ब्राउझरद्वारे याचा वापर करता येतो. त्याचप्रमाणे एलबी मोटर्ससाठी एबीबी एबिलिटी फॉर स्मार्ट सेन्सर, रिमोट डिजिटल कमिशनिंग आणि ड्राईव्ह्ससाठीच्या सेवांसह भारतीय मोटर्स आणि ड्राईव्हज मार्केटसाठी डिजिटल सोल्यूशन्स तयार करणारे आणि सर्व्हिसेस देणारे एबीबी पहिले ठरले आहेत.