मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडे मोर्चा वळविला आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. येत्या २९ डिसेंबर रोजी त्यांची चौकशी केली जाणार आहे. पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना नोटिस बजावण्यात आली आहे. तसे वृत्त सर्व वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. या नोटिसीमुळे वर्षा राऊत यांना ईडी समोर हजर रहावे लागणार आहे.
दरम्यान, शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यानंतर आता खासदार संजय राऊत यांना ईडीने नोटिस बजावली आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांना जाणिवपूर्वक नोटिसा पाठवून लक्ष्य केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.