शनिवार, ऑगस्ट 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आता आम्ही ‘विकेल तेच पिकवू’! रमेश ससाणे या शेतकऱ्याची यशोगाथा

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 3, 2021 | 1:03 am
in राज्य
0
unnamed

आता आम्ही ‘विकेल तेच पिकवू’!

शेती व्यवसाय हा भारतीय अर्थ व्यवस्थेचा कणा आहे. हे पुन्हा कोरोना सारख्या महामारीच्या काळात सिद्ध झाले… सगळा देश लॉकडाऊन होता… रस्ते थांबले होते… सगळी चाकं जाम होती, पण शेत आणि शेतकरी पोशिंद्याच्या भूमिकेत होता. महाराष्ट्रा सारख्या प्रगत राज्याने या कोरोना काळात उत्तम नियोजन करुन प्रत्येकाच्या घरात भाजी जाईल हे पाहिले.  त्याला सातारा जिल्हाही अपवाद नव्हता.

सातारा जिल्ह्यातील भाजीपाला अगदी मुंबई, पुणे, कोकणातही जातो… लोकांच्या जेवणात हिरवा भाजीपाला देऊन शरीराला आवश्यक असलेल्या मिनरलचा पुरवठा होता…. आता तर राज्य शासनाच्या ‘विकेल ते पिकेल’ या योजनेंतर्गत शेतकरी आणि ग्राहक एकत्र आले आहेत. २६ जानेवारी रोजी साताऱ्यात संत शिरोमणी सावता माळी रयत बाजाराचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील भाजीपाला ग्राहकांपर्यंत पोहचविणाऱ्या शेतकऱ्याची कथा.

रमेश बळवंत ससाणे (भुईंज, ता. वाई) हे विविध प्रयोग करणारे शेतकरी. त्यांच्या संयुक्त कुटुंबाची एकूण 30 एकर शेती आहे. त्यांना नुकतेच शेडनेट उभारणीकरिता शासनामार्फत 50 टक्के अनुदान मिळाले आहे. आता त्यांनी या शेडनेटमध्ये ढोबळी मिर्चीची  लागवड केलेली असून स्वत:चा माल ते स्वत:च ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. थेट माल ग्राहकांपर्यंत जात असल्याने थेट नफा त्यांना मिळत आहे. त्यांनी केलेले काम इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन होईल असेच आहे.

unnamed 1

रमेश बळवंत ससाणे हे भुईंजचे राहणारे शेतकरी आहेत. शिक्षण 9वी पर्यंत झालेलं. या शेडनेटमध्ये ‘पसरेला’ जातीच्या ढोबळी मिरचीची लागवड केली.  सगळा देश लॉकडाऊनमध्ये असताना सप्टेंबरमध्ये हे उभं केलं. याचा खर्च जवळ जवळ 13 लाख रुपये आहे. या शेडनेटसाठी शासनाच्या कृषी विभागाने जवळजवळ 6 लाख रुपयांचं याला अनुदान दिले आहे. यांना यातून जे अपेक्षीत उत्पादन मिळणार आहे ते २० टन असणार आहे. जवळजवळ १० लाख रुपये यांना यामार्फत मिळणार आहेत.  याच्यातला निव्वळ नफा साडेसात लाख पर्यंत जातो. या २० गुंठ्यात शेडनेट मिरची पिकवणे सुरु आहे. प्रत्येकी ४ दिवसाला या मिरचीची तोडणी करतात आणि ठाणे, मुंबई येथील मार्केट आणि स्थानिक मार्केटमध्ये उत्पादित माल विकतात.  एवढ्या 20 गुंठ्याची जागा म्हणजे जवळ जवळ ½ एकरच्या क्षेत्रामध्ये ते कोरडवाहू मधल्या 10 एकर जमिनीतपण निघणार नाही एवढा माल ते एकट्या 20 गुंठ्यात करतात. त्यांना कृषी विभागाचं  मोठं सहकार्य असून वेळोवेळी मागदर्शनही त्यांना मिळतं, 4 ते 5 दिवसाला याच्यावर फवारणी होते. अशा या आगळ्या वेगळ्या आर्थिक कृषी शास्त्रामुळे प्रचंड नफ्यामध्ये आहे. याचा जो खर्च झालेला आहे तो येत्या 1-2 वर्षामध्ये निघून जाईल आणि उरलेला जो नफा आहे तो नफा शेतकरी आर्थिक उन्नत कसा होतो हे दाखवण्यासाठी खूप बोलकं उदाहरण आहे.

रमेश ससाणे यांचं संयुक्त कुटुंब आहे. त्यांच्या घरात एक ॲग्रीकल्चर पदवीधर असल्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे. अगदी कुठली जात वापरायची, मातीचा पोत कुठला आहे. या मातीत कोणत्या प्रकारचे पिक येऊ शकते. हे दुसऱ्या क्रमांकाचे शेडनेट आहे.  याच्या अगोदरपण यांनी शेडनेट घेतलेलं आहे आणि कृषी विभागाची साथ आहे. आणि रात्रंदिवस  फक्त शेती हा यांचा ध्यास आहे. या ध्यासातून त्यांनी आज हे सगळं उभं कलेलं आहे. आणि अक्षरश: सोनं ते उगवतात असं एकूण चित्र आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगणं आहे की, जर शेती मन लावून केली शास्त्र शुद्ध पद्धतीने केली, बाजार मागणी बघून जर केली तर शेती ही परवडू शकते हे याचं बोलकं उदाहरण म्हणजे रमेश सासणेंची शेती आहे.

शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती केली तर निश्चितपणे त्यांना शेतीमध्ये चांगलं उत्पन्न मिळून चांगली आर्थिक उन्नती होवू शकते हे या जिल्ह्यातील रमेश ससाणे यांचे उदाहरण आहे.

– युवराज पाटील (जिल्हा माहिती अधिकारी, सातारा)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आजचे राशीभविष्य – बुधवार – ३ फेब्रुवारी २०२१

Next Post

इंडिया दर्पण विशेष – निसर्ग भेट – नांदूरमध्यमेश्वर (महाराष्ट्राचे भरतपूर)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled१

इंडिया दर्पण विशेष - निसर्ग भेट - नांदूरमध्यमेश्वर (महाराष्ट्राचे भरतपूर)

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

jail11

भाजीपाला व्यावसायीकास मारहाण करीत लुटणा-या तिघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

ऑगस्ट 9, 2025
RUPALI

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी पोलिस महासंचालकांना दिले हे पत्र

ऑगस्ट 9, 2025
प्रातिनिधिक फोटो

रेल्वेने या पॅकेज अंतर्गत मूळ भाड्यात जाहीर केली २० टक्के सुट

ऑगस्ट 9, 2025
fir111

सोसायटीच्या लाईट बीलाच्या वादातून महिलेस घरात घुसून बेदम मारहाण…पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल

ऑगस्ट 9, 2025
crime11

डिजिटल अ‍ॅरेस्टची धमकी देत सायबर भामट्यांनी नाशिक शहरातील तिघांना घातला एक कोटीला गंडा

ऑगस्ट 9, 2025
Sharad Pawar

विधानसभा निवडणुकीच्या वेळी दोन लोक भेटले, १६६ जिंकून देण्याची गँरंटी दिली…शरद पवार यांचा खळबळजनक दावा

ऑगस्ट 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011