मुंबई – एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान १२ हजार धावा करण्याचा विक्रम आता भारतीय कप्तान विराट कोहलीच्या नावावर झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील शेवटच्या एकदिवसीय सामन्यात विराटने हा विक्रम केला. बुधवारी सकाळी जेंव्हा कोहली मैदानावर उतरला तेव्हा हा रेकॉर्ड करण्यासाठी त्याला अवघ्या २३ धावांची गरज होती. आणि चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करत त्याने हा विक्रम स्वतःच्या नावावर केलाच. यापूर्वी सर्वात वेगवान १२ हजार धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या नावे होता.
सचिनने ३०० इनिंगमध्ये १२ हजार धावा केल्या. पण क्रिकेटमधील आपल्या या आदर्शाला मागे टाकत विराटने २४२ इनिंगमध्ये या धावा पूर्ण केल्या आहेत. विराट आणि सचिन शिवाय रिकी पॉन्टिंग, कुमार संगकारा, सनथ जयसूर्या आणि महेला जयवर्धने या फलंदाजांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२ हजार किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.