नवी दिल्ली – कोरोना महामारीच्या काळात स्वसंरक्षणासाठी विविध स्तरावर जनजागृतीचे काम सुरु आहे. यात मोबाईल कंपन्या देखील मागे नाहीत. फोन लावतांना कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी विविध पद्धतीने माहिती दिली जाते.
सध्या जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील एक माहितीपर ध्वनिफीत सर्व मोबाईल कंपन्यांनी ठेवली आहे. यावर आधी देखील विरोध करण्यात आला होता. मात्र, सीमेवरील एका सीआरपीएफच्या जवानाने यावर आक्षेप घेतला. त्याचे ऑडिओ रेकॅार्डिंग फेसबुकवर व्हायरल झाले आहे. त्यात कंपनीला फोनकरून याबाबत विचारणा हा जवान करत आहे.
अमिताभ बच्चन यांना स्वतःला कोरोनाची लागण झाली होती. परिवारातील इतर सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. स्वतः अमिताभ यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांचा आवाजातील माहितीपर संदेश शेअर करून काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत असा सवाल या जवानाने मोबाईल कंपनीच्या कर्मचाऱ्याला केले आहे. तथापि, जाहिरातीचा अतिरेक होत असल्याचे जवानाने म्हटले आहे. सर्व स्तरावर या कॉलरट्युनचा विरोध होत असल्याने आता खुद्द सैन्याच्या जवावाने यावर आक्षेप घेतल्याचा व्हायरल अॅडिअो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.