मुंबई ः राज्यात गेल्या २४ तासात आणखी १३८ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून तीन पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ९७ पोलिस कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. तर, आतापर्यंत ८ हजार ७२२ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. सद्यस्थितीत राज्याच्या विविध भागात एक हजार ९७७ पोलिस उपचार घेत आहेत. तर, आजवर सहा हजार ६७० पोलिसांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तशी माहिती महाराष्ट्र पोलिस दलाने दिली आहे.