सांगली – तालुक्यातील आटपाडी येथील प्रसिद्ध १६ लाखांचा बकरा चोरट्यांनी लंपास केल्याची बाब समोर आली आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही चोरी झाल्याची तक्रार पोलिसांकडे आली आहे. विशेष म्हणजे, चोर हे आलिशान कारमधून आले आणि त्यांनी तो लांबवला आहे. त्यामुळे त्याची पंचक्रोशीत मोठी चर्चा आहे.
आटपाडी येथील प्रसिद्ध असलेल्या उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात बकरे मोठ्या प्रमाणात विक्रीस येतात. याच बाजारात तब्बल दीड कोटी रुपयांचा मोदी बकरा आला होता. याच बकऱ्याचा वंश असलेला बकरा १६ लाख रुपये किंमतीचा आहे. बकऱ्याची चोरी झाल्याची तक्रार त्याचे मालक सोमनाथ जाधव यांनी केली आहे.