मनाली देवरे, नाशिक
—-
डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबाद आणि भारताचा लाडका कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या दोन संघा दरम्यान सोमवारी सायंकाळी दुबईत आयपीएलचा तिसरा सामना रंगणार आहे.
हे दोन्ही संघ गेल्या काही आयपीएल मोसमात फारशी दमदार कामगिरी करू शकलेले नसले तरी या दोन्ही संघात असलेले काही हेवीवेट खेळाडू आणि काही नव्या दमाचे खेळाडू कशी कामगिरी करतात ? याकडे सगळ्याच संघाचे लक्ष असेल.