नाशिक – अंतराळ सप्ताहानिमित्त सध्या ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अंतराळ तंत्रज्ञानाची विलक्षण अनुभूती या निमित्ताने अनुभवण्याची संधी मिळत आहे. अंतराळ तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा याच संकल्पनेतून नॅशनल स्पेस सोसायटी यांच्या वतीने दरवर्षी अंतराळ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी या कार्यक्रमाचे दुसरे पुष्प गुंफले जाणार आहे. सायंकाळी ६.३० ते ७.३० यावेळेत कार्यक्रम पार पडणार असून ‘चंद्र अन्वेषण, विकास आणि वसाहत’ याविषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. आरटेमीस इनोव्हेशन मॅनेजमेंट सोलुशन्सचे अध्यक्ष तथा नॅशनल स्पेस सोसायटीचे संचालक जॉन मॅनकिन्स मार्गदर्शन करणार आहेत. जास्तीत जास्त जणांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
—
कार्यक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Zoom Link
https://us02web.zoom.us/j/
YouTube Link
https://www.youtube.com/watch?