नाशिक – आज हरीहरभेट साजरी केली जात आहे. आजच्या दिवशी कपालेश्वर मंदिरातून समोरच्या सुंदर नारायण मंदिरात बेलाचे पान पाठवतात आणि सुंदर नारायण मंदिरातून कपालेश्वरासाठी तुळशीचे पान पाठवून प्रतिकात्मक हरीहर भेट घडवली जाते. सुंदर नारायण मंदिराचा इतिहास अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. सुंदरनारायण मंदिराच्या जागेवर एक प्राचीन विष्णू मंदिर होते. ते पाडून तिथे मशीद आणि कबरस्थान केले गेल्याचा नोंदी आहेत. पुढे पेशवे काळात त्या जागेची साफसफाई केली गेली आणि पुन्हा जे मंदीर उभारले गेले ते आजचे सुंदरनारायण मंदिर, असा उल्लेख आहे.
भारत इतिहास संशोधन मंडळाच्या एका पुस्तकात या मंदिराबद्दल जी माहितीची नोंद आहे ती अशी