मुंबई – व्हेलाईंटेन्स डे केवळ एक दिवस साजरा होत नाही. त्यापूर्वीचे सात दिवस वेगवेगळ्या डेजने गाजलेले असतात. त्यात रोज डे, चॉकलेट डे, प्रपोज डे आदींचा समावेश आहे. आज त्यापैकी एक चॉकलेट डे असून तो कसा साजरा करायचा हे जाणून घेऊ या…
दिवस रोमँटीक करण्यासाठी आपल्या पार्टनरसोबत स्पेशल चॉकलेट डिश तयार करा. यात मूससह केक, पेस्ट्री, कुकीज यापैकी जेही सोपे आणि एकमेकांना आवडणारे असेल तो पर्याय निवडा. पार्टनरला खूश आणि इंप्रेस करण्यासोबतच तुमचे टॅलेंटही दिसेल. हल्ली पार्लरमध्ये स्पाचे अनेक पर्याय उपलब्ध आहे. त्यात एक चॉकलेट स्पादेखील आहे. त्यामुळे पार्टनरसाठी चॉकलेट स्पा बुक करा. यातून थकवा तर दूर होईलच शिवाय रोमांसपण वाढेल. याशिवाय तुम्ही पार्टनरसाठी चॉकलेट केकही आर्डर करू शकता. त्यावर पार्टनरचे नाव लिहा. ही कल्पना खूप जबरदस्त ठरेल. दिवसाची सुरुवातही चॉकलेट ब्रेकफास्टने करता येते. यात ब्राऊनी सह कॉफीदेखील तुम्ही मिक्स करू शकता. चॉकलेट मिल्स शेक देखील इन्संट आणि सोपा पर्याय आहे.
चॉकलेट गेमचा पर्याय
चॉकलेट गेममध्ये पार्टनरसाठी एखादा सरप्राईज प्लान करा. हे सरप्राईज कुठेतरी लपवून ठेवा आणि क्ल्यूच्या मदतीने पार्टनरला ते शोधायला लावा. प्रत्येक क्ल्यूवर एक रोमँटिक मेसेज लिहा. त्यामुळे अधिकच रंगत वाढेल.