शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आजी सोबत राबली पोरं, मनरेगामुळे पिकली बोरं…

by Gautam Sancheti
मार्च 9, 2021 | 10:54 am
in राज्य
0
Ndr

नंदुरबार – विमलताई पाटील यांचे वय अधिक असले तरी त्या थकलेल्या नाहीत. अजूनही शेतकामात लक्ष घालतात. शेती विषयी भरभरून बोलतात. कापूस लावून फारसे उत्पन्न मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून फळबाग लागवड केली. कुटुंबातील सर्व सदस्यांनी बागेसाठी कष्ट घेतले आणि अधिक उत्पन्न देणारी ॲपल बोरांची बाग शेतात उभी राहिली आहे.
विमलबाईंच्या नावे नंदुरबार तालुक्यातील आसाणे गावात 2 हेक्टरचे क्षेत्र आहे. आतापर्यंत संपूर्ण शेतात कापूस लावला जाई. अधिक कष्ट घेऊनही उत्पन्न मात्र मर्यादित होते. निसर्गाने साथ दिलीच तर 40 हजारापर्यंत उत्पन्न येई. उत्पन्नाच्या तुलनेत होणारा खर्च आणि कष्ट अधिक होते. त्यामुळे त्यांनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून फळबाग लागवड करण्याचा निर्णय घेतला.
आपल्या शेतातील 1 हेक्टर क्षेत्रात त्यांनी ॲपल बोराची लागवड केली. पहिल्या वर्षी आलेला बहार काढून टाकला. दुसऱ्या वर्षापासूनच त्यांना उत्पन्न मिळण्यास सुरूवात झाली. गतवर्षी 60 हजार रुपये उत्पन्न मिळाले. त्यासोबत अकुशल मजूरीचे 68 हजार रुपये आणि रोपांसाठी 17 हजार रुपये देखील मनरेगाच्या माध्यमातून मिळाले आहेत. यावर्षी पावसामुळे पीकाचे नुकसान झाले असले तरी  साधारण 55 क्विंटल बोरे सुरत आणि पुण्यातील व्यापाऱ्यांनी नेली आहेत.

unnamed 1

आजींनी शेतात मनरेगातून गांडूळ खताची टाकी तयार करून घेतली आहे. त्यासाठी 5800 रुपये मजूरीचे मिळाले. साधारण 6000 रुपये किंमत असलेले गांडुळखत शेतासाठी अवघ्या काही महिन्यात उपलब्ध झाले आहे. योजनेतून शेतात सिंचन विहिर तयार करण्यात आली असून पाईपलाईनद्वारे पाणी शेतात आणले आहे. विहिरीसाठी 1 लाख 96 हजार अकुशल कामासाठी  आणि 83 हजार कुशल कामासाठी खर्च मनरेगामधून देण्यात आले.
फळबाग लागवड फायदेशीर ठरत असल्याने यावर्षी बांधावर 20 आंब्याची झाडे लावण्यात आली आहेत. त्यासाठीदेखील योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. फळबाग लागवड केल्यानंतर आंतरपिकदेखील घेता येत असल्याने उत्पन्न वाढण्यासाठी ते उपयुक्त ठरत आहेत. यावर्षी मुगाचे उत्पादन घेणार असल्याचे विमलताईंनी सांगितले.
फळबागेला केवळ गांडुळ आणि शेणखत आवश्यक असल्याने खर्च कमी होतो. कुटुंबातील सदस्य बोरांची तोडणी व इतर कामे करीत असल्याने मजूरीचा खर्चदेखील वाचतो. हा खर्च इतर क्षेत्रावरील पिकांसाठी करता येतो. आजींना त्यांचा मुलगा दिलबर मदत करतो. गेली 30 वर्षे त्या शेतात काम करीत आहेत. अनेक वर्षाच्या अनुभव असल्याने फळबाग लागवडीने झालेला फायदा त्यांना लक्षात आला आहे. शेतातील 400 रोपांची आता छाटणी होऊन आंतरपीक घेतले जाईल आणि पुढच्या मोसमात परत एकदा बहरलेली फळबाग अधिक उत्पन्न देईल असा विश्वासही त्यांना आहे.
आजींचे बहरलेले शेत पाहून परिसरातील इतरही शेतकरी फळबागे विषयी जाणून घेण्यासाठी शेताला भेट देत आहेत. गावात ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने 70 पेक्षा अधिक फळबाग घेण्याचे नियोजन आहे. तांत्रिक सहायक संदिप वाडिले आणि ग्रामरोजगार सेवक शरद पाटील यांचे मार्गदर्शन असल्याने योजनेच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचे प्रमाण वाढते आहे. विमलताईंच्या शेतात यशस्वी ठरलेली फळबाग लागवड इतरांनाही प्रोत्साहन देणारी ठरली आहे.

unnamed

विमलताई सांगतात की, कापसाचे उत्पादन घेताना अधिक खर्च करूनही मजूर मिळत नाही. याउलट फळबागेसाठी मजूरांची आवश्यकता नाही, फवारणी  लागत नाही. मजूरीमुळे पैसे घरातच रहातात. कापसावर अधिक खर्च करण्यापेक्षा फळबागेचे क्षेत्र वाढविल्याने पावसाचे संकट येऊनही अधिक फायदा झाला आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वाहतूक बेटामुळे सुदंर देवळाली साकारण्यास हातभार – मीनल लाठी

Next Post

उद्यम नोंदणी आता अधिक सोपी; हा केला बदल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Eb5Kh0KXgAAaEN0

उद्यम नोंदणी आता अधिक सोपी; हा केला बदल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011