नाशिक – वाळत टाकलेले कपडे काढण्यासाठी आजी समवेत इमारतीच्या टेरेसवर गेलेल्या आठ वर्षीय बालकाचा पाचव्या मजल्यावरून पडल्याने मृत्यु झाला. ही घटना गंगापूररोड भागात घडली. याघटनेने हळहळ व्यक्त होत असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
श्रेयश मयुरेश शिरवाडकर (रा.टिळकनगर,डोंबिवली कल्याण) असे मृत बालकाचे नाव आहे. श्रेयश हा विवाह सोहळ्या निमित्त गंगापूररोड भागात राहणाºया आपल्या मामाच्या घरी आला होता. शुक्रवारी (दि.१८) आपल्या आजी समवेत तो टेरेसवर वाळत टाकलेले कपडे काढण्यासाठी गेला असता ही घटना घडली. आजी व तीन नातवंडे टेरेसवर कपडे काढण्यासाठी गेले होते. खेळत असतांना अचानक तोल गेल्याने श्रेयस इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली कोसळला. इमारतीला लावलेली जाळी फाटल्याने तो थेट जमिनीवर आदळला. या घटनेत मोठी दुखापत झाल्याने मामा प्रतिक अनईकर यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार खैरनार करीत आहेत.