मुंबई – केंद्र सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांमुळे १ ऑक्टोबरपासून काही बदल होणार आहेत. ते पुढील प्रमाणे
वाहन चालविताना लायसन्स सक्ती नाही
वाहन चालवताना आता लायसन्स व नोंदणीची कागदपत्रे जवळ ठेवण्याची गरज पडणार नाही. याची सॉफ्ट कॉपी मान्य होणार आहे. मोटार वाहन कायदा १९८९ मध्ये दुरुस्तीनुसार वाहनांची कागदपत्रे आयटी पोर्टलवर राहणार आहेत.
मोबाइल वापरु शकता पण
वाहन चालवताना हातात मोबाइलचा वापर रूट नेव्हिगेशनसाठी करता येऊ शकेल. मात्र, चालकाचे लक्ष विचलित न होण्याची दक्षता घ्यावी लागेल. मात्र, मोबाइलवर बोलताना आढळल्यास ५ हजार रुपये दंड होऊ शकेल.
आरोग्य विम्यात हे बदल
विमा नियामक इर्डा (आयआरडीए) ने आरोग्य विम्यात काही बदल केले आहेत. त्यानुसार, पॉलिसीधारकाने सलग ८ वर्षे हप्ते भरलेले असल्यास कंपन्या दावा (क्लेम) नाकारु शकणार नाहीत. तसेच जास्त आजारही कव्हर होऊ शकतील. यामुळे विम्याचा हफ्ता मात्र वाढणार आहे. ग्राहकांनी कंपनी बदलली तर जुना प्रतीक्षा काळ असेल.
मोहरीचे शुद्ध तेल मिळेल
एफएसएसएआयने मोहरीच्या तेलात अन्य तेल मिसळण्यास मनाई केली आहे. आजवर तांदळाचा भुसा अथवा ब्रॅन, तेल किंवा स्वस्त तेल यात मिसळले जात होते.
टीव्ही महागणार
केंद्र सरकारने रंगीत टीव्हीच्या असेब्लिंगमध्ये वापरले जाणारे ओपन सेल कॉम्पोनंटच्या आयातीवर ५ टक्के सीमाशुल्क लावले आहे. यावर सरकारने एक वर्ष सूट दिली हाेती. त्यामुळे आता टीव्हीच्या किंमती वाढणार आहेत.
गुगल मीटवर ६० मिनिटेच
ऑनलाइन मीटिंगसाठी गुगल मीट सर्वाधिक वापरले जाते. मात्र, त्याचा मोफत वापर आता मर्यादित करण्यात आला आहे. मोफत ही सुविधा केवळ ६० मिनिटेच वापरता येणार आहे. मात्र, जे पैसे अदा करतील त्यांनी दीर्घकाळासाठी वापरता येईल