नवी दिल्ली – बरोबर ९० वर्षापूर्वी १३ फेबुवारी १९३१ मध्ये राजधानी नवी दिल्लीचा उद्घाटन समारंभ झाला. त्यापुर्वी १९११ मध्ये दिल्लीत एक दरबार भरला त्याला सिक्कीमपासून ते बर्मापर्यंतचे राजे, महाराजे, राजपुत्र, हैदराबादचा निजाम आणि भोपाळ संस्थानमधील बेगम यांनी समारंभात हजेरी लावली होती. याप्रसंगी हजारोंच्या जमावासमोर ब्रिटीश सम्राट जॉर्ज पंचम यांनी भारताची राजधानी कोलकाता येथून दिल्ली येथे हलविण्याची घोषणा केली.
नवीन राजधानी तयार करण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यानंतर एक वर्षांच्या प्रयत्नांनंतर आजूबाजूची सुमारे पंचवीस-तीस गावे येथे आणून तांबू नगरीत रूपांतरित झाली आणि त्याकरिता सुविधा उभारण्यात आल्या. त्या वेळी ८५ एकरवर सम्राट जॉर्ज (पाचवे ) यांच्या कल्पनारम्य आकारातील शहर तयार करणे, पुनर्वसन आणि सुशोभित करणे हे एक आव्हान आहे, परंतु राजधानीचे निर्माते लुटियन्स यांनी त्यांच्या कल्पनांना सुंदर आकार देऊन सुमारे २० वर्षात नवी दिल्ली उभारली.
या संबंधी स्वप्ना लिडली आपल्या कॅनॉट प्लेस या पुस्तकात लिहितात की, जेव्हा नवी दिल्लीचा आराखडा तयार केला जात होता, तेव्हा हे शहर कशा प्रकारचे असेल याबद्दल कारागिरांच्या मनात अनेक शंका होत्या. कारण एडवर्ड लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर यांच्याकडेही शाह जहानाबादचे मॉडेल होते. त्यानंतर लुटियन्स यांना नवी दिल्लीच्या स्थापत्यकलेची जबाबदारी सोपविण्यात आली होती. इमारतींच्या उंची देखील कमी ठेवण्यात आल्या होत्या.
आर्किटेक्ट ए. के. जैन यांचे म्हणणे आहे की, इंडिया गेट व शासकीय कॉम्प्लेक्स वगळता कोणतीही इमारत फार उंच नव्हती. ब्रिटीशांनी बहुमजली इमारत अजिबात बांधली नाही. कारण ते गार्डन सिटी बांधत होते. साधारणतः झाडाची उंची ५० फूट असते. त्यामुळे नवी दिल्लीतील इमारती यापेक्षा कमी उंचीवर ठेवण्यात आल्या.
परंतु, शहराला बागेचे स्वरूप यावे, म्हणूनच रस्त्यांच्या कडेला हिरवीगार झाडे लावली गेली. बरीच मेहनत घेतल्यानंतर १३ प्रकारच्या झाडे निवडली गेली. तसेच चौक चौकात फुले लावली गेली. रोडवे दरम्यान १९२० मध्ये वृक्षारोपण काम सुरू झाले. सचिवालयाच्या उद्घाटनापर्यंत ही झाडे चांगल्या प्रकारे वाढलेल्या आकारात दिसू लागली. कालांतराने, हिरवेगार क्षेत्र हळूहळू वाढले, आणि नवी दिल्लीचे रुप पालटले.