आजचे राशीभविष्य – १४ ऑक्टोबर – बुधवार
मेष- अनपेक्षित गोड बातमी
वृषभ- सबुरीने घ्या
मिथुन- वेट अँड वॉच
कर्क- स्वप्नपूर्ती होईल
सिंह- थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन
कन्या- विचारपूर्वक आश्वासन द्या
तूळ- नित्य क्रमात तारेवरची कसरत
वृश्चिक- श्रमसाफल्य
धनु- शब्द सांभाळा
मकर- यशप्राप्ती
कुंभ- होशियार राहो
मीन- मेहनतीला लवकरच यश
……
शंकासमाधान
प्रश्न – फिलिप्स- हस्तरेषा अभ्यास करताना हातांच्या विविध रेषांवरून वयाचा LINE AGE अंदाज लावण्याची पद्धत कशी आहे?
उत्तर- हस्तरेषा वरून वयाचा अंदाज काढण्याचे विविध पद्धती आहेत. परंतु जी पद्धत आम्ही वापरतो ती अशी की हातावरील अंगठ्या खालील शुक्राच्या उंचवट्यावर एक मध्य बिंदू जेल पेनने आखून घ्यावा. त्या बिंदूपासून तर्जनीच्या तळापर्यंत दोन्ही बाजूने एक एक रेषा त्या बिंदूपर्यंत काढावी. त्याचप्रमाणे मधल्या बोटाच्या अनामिकेच्या तसेच करंगळीच्या तळाला पोटाच्या दोन्ही बाजूने शुक्र बिंदूपर्यंत रेषा आखाव्यात. आता आपल्याला पाच रेषा शुक्र बिंदूपर्यंत जाणाऱ्या मिळाल्या म्हणजेच त्या रेषांमधील सहा ठिकाणी गॅप दिसेल. तो एक GAP म्हणजेच वयाचे दहा वर्ष अंतर मानावे अशा पद्धतीने ब्रेन लाईन, हार्ट लाईन, लाईफ लाईन, लकी लाईन वर ज्या ज्या ठिकाणी या रेषा क्रॉस करून गेलेल्या आहेत तो तो एक GAP म्हणजे दहा वर्षाचा पडाव होय. आता ‘AGE काउंटिंग करताना ब्रेन लाईन, हार्ट लाईन, लाईफ लाईन यावर प्रत्येक दहा वर्षाच्या ग्रुप मध्ये अजून एक मध्यबिंदू घ्यावा म्हणजे अजून मायक्रो अॅनालिसिस करता येईल. फक्त या तिन्ही रेषांवरून खाली म्हणजे बोटांच्या टोकाकडून मनगटाकडे चढत्या क्रमाने 10, 20, 30, 40, 50, 60 असे आकडे टाकावे. घेतलेल्या मध्यबिंदूवर दरम्यानचे 5/5 यंत्राचे वयाचे आकडे टाकावे. यामध्ये फक्त भाग्यरेषा म्हणजेच लकी लाईन जी मनगटावरील मणी बंधा कडून मधल्या बोटाला खालील शनि उंचवट्यावर जाते त्या रेषेचे लाईफ काउंटिंग मात्र खालून वर अशा उलट दिशेने केले जाते. आता या सर्व रेषांमधील दिसत असलेल्या पडाव तसेच उप पडाव यामध्ये असलेल्या शुभाशुभ चिन्हांवरून तज्ञांकडून LIFE PREDICTION करून घ्यावे.
शाळीग्राम टीप-
पूजेसाठी शाळीग्राम विकत घेताना शाळीग्राम सारंग हा सर्वत्र सारखा असतो. काही ठिकाणी काळसर भुरका तर काही ठिकाणी डार्क काळा असा संमिश्र असतो. पूर्णपणे डार्क काळा अथवा करड्या रंगाचा घेणे टाळावे.
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड असल्याने शुभ कार्य टाळावीत.
……………………
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.