आजचे राशीभविष्य – १३ ऑक्टोबर – मंगळवार
मेष- संमिश्र दिवस
वृषभ- व्यवसायाच्या हालचाली गतिमान
मिथुन- वाद विकोपाला नेऊ नये
कर्क- मान प्रतिष्ठा
सिंह- आर्थिक जुळवणे अवघड
कन्या- भावनांची जुळवाजुळव
तूळ- खर्च सांभाळा
वृश्चिक- अडचणीचा व्यवहार
धनु- आडाखे चुकतील
मकर- नोकरीच्या सुवर्णसंधी
कुंभ- मोठा खर्च नको
मीन- गुंतागुंतीचा व्यवहार टाळा
…….
शंकासमाधान
प्रश्न सौ शेवतेकर – षडाष्टक म्हणजे काय?
उत्तर- षडाष्टक म्हणजे काही राशींचे स्वभाव गुण. हे काही राशींशी त्या प्रमाणात जुळत नाहीत. या राशींचा एकमेकांशी षडाष्टक आहे, असे म्हणतात. उदाहरणार्थ मेष ×कन्या.. वृषभ× धनु.. मिथुन ×वृश्चिक.. कर्क× कुंभ… सिंह ×मकर… तूळ ×मीन… जरी राशी षडाष्टक असले तरी एकमेकांच्या स्वभावातील आवडी, निवडी, गुण, अवगुण एकमेकांनी समजून घेतले तर षडाष्टकातील राशी देखील गुण्यागोविंदाने राहतात. याची देखील हजारो उदाहरणे आहेत.
प्रश्न वेलींगकर- नक्षत्र म्हणजे काय?
उत्तर- ज्या मार्गाने विविध ग्रह सूर्याभोवती फिरतात त्या मार्गाला क्रांतिवृत्त असे म्हणतात. हे क्रांतिवृत्त लंब वर्तुळाकार आहे. क्रांती वृत्ताचे ३६० अंश सारखे समान सत्तावीस भाग केले आहेत. या सत्तावीस भागांना १३ अंश व २० कलांचा भाग केला आहे. या भागांमध्ये चमकणारे तारकापुंज आहेत, यांनाच नक्षत्र असे म्हणतात.
वास्तू खरेदी नक्षत्र टीप-
आर्द्रा असलेशा ज्येष्ठा मूळ ही नक्षत्रे जर शनिवारी येत असतील त्या दिवशी नवीन वास्तु खरेदी करावी. तर रविवारी अनुराधा, सोमवारी उत्तरा शा., मंगळवारी शततारका, बुधवारी अश्विनी, गुरुवारी मृग, शुक्रवारी असलेशा आणि शनिवारी हस्त ही नक्षत्रे येत असल्यास दूरचा प्रवास टाळावा.
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार असल्याने शुभ कार्य टाळावे.
……………………
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.