आजचे राशीभविष्य – १२ ऑक्टोबर – सोमवार
मेष – कर्तृत्वाला वाव मिळेल
वृषभ- निर्णयास गतिमानता येईल
मिथुन- कायदेशीर बाबी सांभाळा
कर्क- असंगाशी संग नको
सिंह- परिचितांचा फायदा
कन्या- शारीरिक पीडा
तूळ- इतरांनाही समजून घ्या
वृश्चिक- जनसंपर्क वाढेल
धनु- जुना संबंधांचा फायदा
मकर- नवीन वाहन योग
कुंभ- फसगत टाळा
मीन- जेवढ्यास तेवढे राहा
………
शंकासमाधान
प्रश्न विश्वजीत – विवाहासाठी भावी जोडीदार कोणत्या दिशेचा असेल याचा अंदाज कसा करतात?
उत्तर- कुंडली, भाग्यांक, हस्तरेषा, फेस रेडींग अशा विविध पद्धतींनी भावी जोडीदाराच्या दिशेचा अंदाज करता येतो. यामध्ये उदाहरणार्थ भाग्यांक पद्धतीने असा अंदाज करताना प्रथम संपूर्ण जन्मतारखेचा एकल संख्येमध्ये भाग्यांक काढून घेणे. आता नियमित कुंडलीची मोकळी चौकट मांडणे. त्यामधील भाग्योदयच्या म्हणजे नवं घरात आलेला भाग्यांक मांडणे. तिथून पुढील घरांमध्ये ANTICLOCKWISE पद्धतीने नऊ संख्या येईपर्यंत पुढचे आकडे मांडणे. नंतर गॅप राहत असेल तर परत एक ते पुढील आकडे भाग्यांक येईपर्यंत मांडणे. यामध्ये कुंडलीतील सप्तम भावात म्हणजेच भावी जोडीदाराच्या ठिकाणी जो अंक आला असेल त्या अंकावरून जोडीदार कोणत्या दिशेचा असेल याचा अंदाज करता येतो. ही सर्व पद्धत समजण्यास थोडी क्लिष्ट आहे. परंतु सर्व मान्य आहे. जोडीदाराची दिशा भाग्यांकवरून ठरवताना फक्त एक ते नऊ एवढ्याच अंकांचा वापर नवम ठिकाणापासून पुढे परत नवम ठिकाणापर्यंत ऑंटी क्लॉकवाईज करतात.
प्रश्न राजीव- विवाहासाठीचा भावी जोडीदार आपल्यापासून किती अंतरावर असेल याचा अंदाज कसा करतात?
उत्तर- यामध्ये देखील भाग्यांक पद्धत वापरली जाते. याशिवाय दुसरी पद्धत म्हणजे लग्न कुंडलीतील चंद्र लग्न घरापासून कितवा भावामध्ये आहे त्यानुसार लग्नघर ते संबंधित भाव ते प्रत्येक घर तीस किलोमीटर मानून विवाहाच्या भावी जोडीदाराचे आपल्या पासूनचे अंतर कारण याचा अंदाज करता येतो.
….
कुंडली टीप-
कुंडली बनवताना जन्मतारीख जन्मवेळ जन्म ठिकाण या तिन्ही गोष्टी स्पष्टपणे व खात्रीलायक माहिती असल्यासच कुंडली बनवावी…
जप टीप-
जपासाठी दिलेला मंत्र नामोच्चार हा प्रत्येक वेळी स्पष्टपणे उच्चारवा.
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ असल्याने शुभ कार्य टाळावीत..
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.