आजचे राशीभविष्य – ११ ऑक्टोबर – रविवार
मेष- आपले विचार प्रभाव पडतील
वृषभ- कुछ पाना कुछ खोना
मिथुन- कलागुणांना वाव
कर्क- शुभ समाचार
सिंह- जुने प्रश्न सुटतील
कन्या- शारीरिक व्याधी मध्ये उतार
तूळ- पाहुण्यांची सरबराई
वृश्चिक- सल्ला जपून ऐकावा
धनु- अनपेक्षित फायदा
मकर- नवीन व्यवसाय संधी
कुंभ- पद प्रतिष्ठा वाढेल
मीन- फायद्याच्या संधी
……
शंकासमाधान
प्रश्न – रोहिणी – मुलांक आणि भाग्यांक म्हणजे काय? त्यावरून अंदाज कसा करतात?
उत्तर- मुलांक आणि भाग्यांक NUMERLOGY याद्वारे विविध प्रकार चे अंदाज व्यक्त करता येतात. मुलांक RADIX काढताना फक्त जन्मतारखेच्या अंकांची एकल संख्या पर्यंत बेरीज करावी. त्यातून मिळणारी एक संख्या हा मूलांक होय. उदाहरणार्थ जन्मतारीख १५ असल्यास १+५=६ म्हणजे मूलांक ६ होईल. तर जन्मतारीख १० असेल तर १+०=१ म्हणजे मूलांक येईल. तर भाग्यांक काढताना संपूर्ण जन्म तारीख महिना व साल यांची एकल संख्या येईपर्यंत बेरीज करावी उदाहरणार्थ ११-१०-१९२०=१५ म्हणजे =१+५=६ म्हणून भाग्यांक ६ येईल. मूलांक व भाग्यांक हे मित्र गटातले असले पाहिजे. मित्र गटातील मूलांक व भाग्यांक शुभ परिणाम देतात, तर शत्रू गटातील मूलांक व भाग्यांक अधिक परिश्रम करण्यास भाग पडतात. फक्त मूलांक व भाग्यांक आवरून केलेल्या अंदाजावर अवलंबून न राहता एखाद्या व्यक्तीची भागीदारी करायची असल्यास अथवा व्यवहार करायचा असल्यास त्याचा मूलांक व भाग्यांक काय आहे ते मित्र गटातले आहेत काय? ते आपल्या मित्र गटातले आहेत काय? अथवा ज्या दिवशी विशिष्ट निर्णय घ्यायचा असेल अथवा व्यवहार करायचं असेल त्या दिवशीचा मूलांक व भाग्यांक आपल्या मित्र गटामध्ये आहे काय? त्या दिवशीच्या नक्षत्राचा भाग्यांक आपल्या मित्र गटात आहे काय? या सर्व बाबी पडताळून बघून तज्ञांच्या सल्ल्याने भाग्यांक व मूलांक यावर आधारित निर्णय घ्यावेत.
प्रश्न साक्षीका – नावाच्या स्पेलिंग मध्ये बदल करून UNLUCKY भाग्यांक अथवा मुलांक यांचे शुभ परिणाम मिळतात का?
उत्तर- ज्याप्रमाणे मूलांक व भाग्यांक पाहिले जातात. त्याचप्रमाणे इंग्लिश मध्ये आपले नाव, आडनाव किंवा आपल्या प्रॉडक्टचे ब्रँड नेम यांच्या स्पेलिंग साठी प्रत्येक ALFABET साठी एक नंबर देऊन त्याची बेरीज देखील भाग्यंका प्रमाणेच अंदाज व्यक्त करण्यासाठी वापरली जाते. ज्यावेळी अशा पद्धतीने येणारे मूलांक व भाग्यांक मित्र गटात नसतात, त्यावेळी स्पेलिंग मध्ये थोडासा बदल सुचवला जातो. उदाहरणार्थ, डबल EE अथवा II जोडणे ज्यामुळे मूलांक व भाग्यांक हे मित्र गटात येऊन शुभ परिणाम मिळतात. असाही एक मतप्रवाह आहे. मुलांक आणि भाग्यांकचे FRIENDLY COMBINATION….BAD COMBINATION….DEADLY COMBINATION असे तीन गट पडतात.
—
हस्तरेषा टीप-
हस्तरेषा मार्गदर्शन सूर्यास्तानंतर त्याचप्रमाणे अमावस्या अथवा उपवासाचा दिवशी टाळावे.
जपमाळ टीप-
ज्या ग्रह दोषामुळे जप करण्यात आला आहे, त्याच ग्रहाशी संबंधित उप रत्नाच्या माळेने जप करावा.
आजचा राहू काळ
सायंकाळी साडेचार ते सहा असल्याने शुभकार्य टाळावेत.
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.
सुंदर असे मार्गदर्शन केले
धन्यवाद,