आजचे राशीभविष्य – सोमवार – ९ नोव्हेंबर २०२०
मेष- अचूक शब्दांचा वापर करा
वृषभ- चिकाटी कायम ठेवा
मिथुन- अंदाज अंशतः बरोबर येतील
कर्क- मित्रपरिवारात रमाल
सिंह- टारगेट जवळ आहे
कन्या- भावनिक कटुता टाळा
तूळ- सर्व बाजूने विचार करा
वृश्चिक- श्रेयाची अपेक्षा नको
धनु- संयम फायदा देईल
मकर- शुभवार्ता मिळेल
कुंभ- जुन्या आठवणींना उजाळा
मीन- नियोजनाचा पुनर्विचार करा
…
शंकासमाधान-
प्रश्न- शारंगपाणी मी करत असलेल्या कोणत्याही कामाला म्हणावे असे श्रेय मिळत नाही. म्हणून माझी कार्यक्षमता कमी होत आहे असे वाटते?
उत्तर- आपली जन्मपत्रिका तसेच हाताच्या रवी बोटावरील जाळीदार भाग, त्याचप्रमाणे आपल्या वास्तू प्लॅन मधील वायव्य दिशा यांचा परस्पर संबंध आहे. तो बघता अशा पद्धतीचे विचार हा केवळ आपल्याला एक दोन ठिकाणी आलेल्या अनुभवाचा परिणाम आहे. आपण संपूर्णपणे स्वतःच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवा. डिसेंबर-जानेवारीपासून बदलत असणारे सकारात्मक ग्रहमान आपल्याला चौफेर यश देऊन जाणार आहेत. त्या यशाला आपल्या कार्यक्षमतेची भेट द्या.
वास्तुशास्त्र टिप्स-
सध्या दिवाळीनिमित्त सर्वांच्या घरी साफसफाई मोहीम सुरू आहे. वास्तूमध्ये गंज लागलेल्या वस्तू, बंद असलेली मशिनरी, वापरात नसलेल्या धारदार वस्तू, काचेच्या तुटलेल्या फ्रेम्स, तडा गेलेला आरसा, तुटका कंगवा, तडा केलेली भांडी अशा वस्तू नकारात्मक ऊर्जा तयार करतात. अशा वस्तू वास्तूमध्ये ठेवू नयेत.
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे.
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.