आजचे राशीभविष्य – सोमवार – ८ फेब्रुवारी २०२१
मेष – आर्थिक निर्णयात सावधानता
वृषभ – व्यवसायिक स्थितीचे अवलोकन करा
मिथुन – मित्र परिवाराच्या आठवणीत रमाल
कर्क – स्वतःला शांत ठेवा
सिंह – सामाजिक भान बाळगावे
कन्या – सहकाऱ्यांकडून मदत
तूळ – अंतःप्रेरणा शोधावी
वृश्चिक – तुझ आहे तुझपाशी परी तू जागा चुकलासी
धनु – हेलपाटा होणार नाही, याची काळजी घ्या
मकर – कृतीमध्ये सातत्य ठेवा
कुंभ – वास्तविक तिचे भान असावे
मीन – बौद्धिक विषयात लक्ष घाला
……..
शंकासमाधान
प्रश्न- विश्वंभर – नीलम रत्नाबाबत बरेच समज-गैरसमज आहेत?
उत्तर- अनेक सेलिब्रिटींच्या हातात दिसणारे नीलम हे शनीचे रत्न आहे. पत्रिकेतील विपरीत शनी योगामध्ये सूचवले जाते. तज्ञ व्यक्तीकडूनच नीलम स्वीकारावा. विविध प्रकारचे नीलम रत्न मिळतात. त्यातील काश्मीर नीलम हा अत्यंत महाग असतो. मकर अथवा कुंभ राशी असणाऱ्यांनी तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याने अतिशय चांगल्या प्रतीचा A GRADE नीलम धारण करण्यास सांगितले जाते. हलक्या निळ्या रंगाचा निलम SKY BLUE उच्च प्रतीचा मानला जातो. नीलम धारण करण्याच काही नियम आहेत. तीन दिवस नीलम स्वतःजवळ ठेवा. फारसे नकारात्मक काही न वाटल्यास अंगठीत चांदी अथवा लोखंड यात धारण करावा. (सध्या मकर राशीला साडेसातीची मधली अडीचकी सुरू आहे. उच्च प्रतीचा नीलम वापरण्याचा सल्ला यामुळे अनेक तज्ञ देतात). डाव्या हाताच्या मधल्या बोटांमध्ये नीलम वापरावा. नीलम रत्न काढून ठेवू नये. दुसऱ्याला वापरण्यास देऊ नये. अथवा दुसऱ्याचे वापरू नये. स्वतःच्या मनाने निलम घेऊ नये. आपल्याला माहिती नसल्यास नीलम वापरण्याचा सल्ला देऊ नये. अतिशय सकारात्मक, अनपेक्षित अनुभव अथवा त्याउलट अनुभव हे निलमचे विशेष आहे, असा अनेक वाचकांचा अनुभव आहे.
……
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे..
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.