आजचे राशीभविष्य – सोमवार – ७ डिसेंबर २०२०
मेष- संयम महत्त्वाचा
वृषभ- संयमित आहार फायदाचा
मिथुन- विचारपूर्वक मध्यस्थी करा
कर्क- गैरसमज टाळा
सिंह- येनकेन फायदा बघा
कन्या- चल ऐकलाच पाहिजे असा आग्रह नको
तूळ- स्तुतिपाठक ओळखा
वृश्चिक- कल करे सो आज
धनु- सर्वच फायदा आपला होणार नाही
मकर- समस्या सुटत नसतील तर सोडून द्या
कुंभ- शब्द हीच गुंतवणूक
मीन- वेळ व पैसे दोन्हीचा अपव्यय टाळा.
…….
शंकासमाधान
प्रश्न- सौ परांजपे – पूजेमध्ये मंगल कलशावर नारळ का ठेवतात?
उत्तर- नारळ हे पंचातत्वाचे प्रतिक आहे. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे “पिंडी तेच ब्रह्मांडी” म्हणजे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात म्हणजे आपल्या शरीरात आहे. आकाश पृथ्वी अग्नी वायु व जल या पाच तत्त्वांनी ब्रह्मांडाची निर्मिती झाली आहे हीच पाच तत्वे नारळा मध्ये आहेत. अग्नि तत्त्वाचे प्रतीक त्रिकोण म्हणजेच नारळाची शेंडी. वायु तत्त्वाचे प्रतीक म्हणजे नारळाच्या पाण्याचा सुवास.. आकाश तत्व म्हणजे नारळाच्या आतील पोकळी.. तो म्हणजे नारळातील पाणी.. आणि पृथ्वीतत्त्व म्हणजे नारळाची कठीण कवच.. कलश पूजना वेळी नारळ ठेवताना सर्व पंचतत्त्वांची अधिष्ठान समप्रमाणात असुदे अशी प्रार्थना आपण पूजेमध्ये करत असतो.
…..
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे.
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.