आजचे राशीभविष्य – सोमवार – ५ ऑक्टोबर
मेष- आत्मविश्वास वाढेल
वृषभ- सावधानता बाळगा
मिथुन- शब्द सांभाळून वापरा
कर्क- यशप्राप्ती
सिंह- श्रमाचे चीज
कन्या- अंशता अंदाज बरोबर येतील
तूळ- पेरलेलं उगवेल
वृश्चिक- ऐकावे जनाचे करावे मनाचे
धनु- नवी खरेदी
मकर- आप्तेष्टांच्या भेटीगाठी
कुंभ – खर्चिक दिवस
मीन- ज्येष्ठांकडून काळजी
……..
शंकासमाधान
प्रश्न आवटी – वास्तूरत्न अध्याय म्हणजे काय?
उत्तर- वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या वास्तूमध्ये पाचपेक्षा अधिक महा वास्तु दोष असल्यास अथवा आपली पूर्णपणे विदिशा वास्तु असल्यास वास्तु बदलणे शक्य नसल्यास वास्तूरत्न अध्याय विधी सुचवला जातो. यामध्ये वास्तूच्या ब्रह्म तत्त्वापासून समान अंतरावर रत्नांचा निक्षेप केला जातो. पुढील प्रमाणे ईशान्य दिशेला स्फटिक पूर्वेला हिरा, अग्नेय दिशेला पोवळे, दक्षिण दिशेला नीलम, नैऋत्य दिशेला पुष्कराज, पश्चिम दिशेला पाचु, वायव्य दिशेला गोमेद, उत्तर दिशेला मूर्ती व ब्रम्हा तत्वातील ब्रह्म बिंदू मध्ये रत्नराज माणिक अशी स्थापना केली जाते. या विधीला सिद्ध रत्नाध्याय विधी असे म्हणतात. हा विधी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली असेच तज्ज्ञांनी सुचवल्यानंतरच कोण ते रत्न किती कॅरेट घ्यायचे याचा सल्ला घेऊनच करावा.
प्रश्न शिशिर- चेहऱ्यावरून भविष्य सांगताना कोणती पद्धत वापरतात?
उत्तर- चेहऱ्यावरून भविष्य सांगताना प्रत्येक तज्ज्ञ आपली स्वतंत्र पद्धत वापरत असतो. त्यासोबतच त्यांचा अनुभव हा देखील महत्त्वाचा असतो. मुख्यतः चेहऱ्याचे तीन भाग असतात. कपाळ भुवया, भुवया ते ओठ, हनुवटी परिसर. यातील कपाळाच्या भागाला कॉस्मिक एरिया म्हणतात. यावरून बौद्धिक क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता, संकटाला सामोरे जाण्याची क्षमता, व्यक्ती संग्रह स्वभाव, धार्मिकता यासह विविध गोष्टींचा अंदाज करता येतो. त्याचप्रमाणे भुवया ते ओठ या भागाला चेहऱ्याचा ग्लोबल एरिया म्हणतात. यावरून भावना, व्यवहार, सामाजिक वागणे, उत्तरदायित्व जबाबदारी पेलण्याची क्षमता, सर्वसामान्य हुशारी यासह विविध गोष्टींचा अंदाज करता येतो. शेवटी हनुवटीच्या भागाला टेल रिक एरिया म्हणतात. यावरुन व्यासंग, अभ्यास करण्याची क्षमता, बुद्धिचातुर्य, मुत्सद्देगिरी, प्रसंगानुरूप हुशारी, नीटनेटकेपणा, संकटे अंगावर घेण्याची क्षमता, विरोधकांना नामोहरम करण्याची क्षमता, अचूक अंदाज, शेवटपर्यंत साथ देण्याची क्षमता यासह विविध गोष्टींचा अंदाज करता येतो. यापेक्षाही सूक्ष्म असे चेहऱ्याच्या विविध भाग करून त्यावरूनही व्यक्तीचा अंदाज करता येतो.
वास्तु टीप-
वास्तूमध्ये अनेक वस्तू भिंतीवर लावाव्या लागतात. अशावेळी एकाच भिंतीला खूप सारे चित्र अथवा पेंटिंग्स लावू नयेत.
रत्न टीप
तज्ज्ञांनी सुचवलेली असल्यासच कछुआ अंगठी घालावी.
विवाह टीप
वधू अथवा वर यांच्या पाहण्याच्या कार्यक्रमासाठी गेले असता समोरील कुटुंबाने त्यांची संपूर्ण वास्तू आपणास स्वतःहून न दाखवल्यास त्यांचा आपल्या स्थळाबाबत सकारात्मक दृष्टिकोन नाही असा अंदाज काढता येतो.
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ असल्याने शुभ कार्य टाळावीत.
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.