आजचे राशीभविष्य – सोमवार – ३० नोव्हेंबर २०२०
मेष- किरकोळ वाद वाढू देऊ नये
वृषभ- कही खुशी कही गम
मिथुन- अनावश्यक खरेदीमुळे डोकेदुखी
कर्क- नवीन संकल्पना राबवण्याचा आनंद
सिंह- समर्पक शब्दांचा वापर गरजेचा
कन्या- व्यवसायिक विरोधकांची डोकेदुखी
तूळ- पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको
वृश्चिक- कुटुंबीयांच्या आवडीनिवडी साठी तारेवरची कसरत
धनु- वसुली साठी फेरे
मकर- नवीन संकल्पना त्वरित राबवा
कुंभ- मतप्रदर्शन सकारात्मक हवे
मीन- एवढे थांबू नका की संधी जाईल.
………..
शंकासमाधान
प्रश्न गौरव- झोपण्याची स्थिती तसेच एकूणच मास्टर बेडरूम बाबत वास्तुशास्त्राचे काय नियम आहेत?
उत्तर- वास्तु मधील पृथ्वी तत्त्वाची दिशा म्हणजेच नैऋत्य दिशा म्हणजेच दक्षिण व पश्चिम यामधील कोपरा याठिकाणी मास्टर बेडरूम असावे. BED उत्तर-दक्षिण ठेवावा तो पण नैऋत्य कोपऱ्यात ठेवणे. बॉक्स बेड वर झोपू नये. शक्य असल्यास जमिनीवरच गादी टाकून झोपावे. डोकं दक्षिण दिशेला पाय उत्तर दिशेला करावे. अपवादात्मक परिस्थितीत डोकं पूर्व दिशेला पाय पश्चिमेला करावे. परंतु कोणत्याही परिस्थितीत डोकं उत्तर अथवा पश्चिम दिशेला करू नये.
बेडरूम मध्ये वाहत्या पाण्याचा धबधब्याचा फोटो लावू नये. देवाचे फोटो बेडरूममध्ये लावू नये. बेडरूममधील WARDROBE चा आरसा रात्री उघडे ठेवू नये. निवृत्त दिशेकडे बेडरूमचे पडद्याचे रंग डार्क घ्यावे. भिंतींचा रंग गुलाबी पिस्ता मॉर्निंग ग्लोरी यापैकी घ्यावा. बेडरूममध्ये पती-पत्नीचा जोडीने हसरा फोटो लावा. फिश टॅंक बेडरूममध्ये ठेवू नये. मंगल कलश बेडरूम मध्ये ठेवू नये. मृत व्यक्तींचे फोटो बेडरूम मध्ये लावू नये. BED म्हणून बॉक्स दिवान असल्यास दिवाना चा आत चारी बाजूला जड वस्तू ठेवावे. बेडशीट तसेच पिलो कव्हर्स हलक्या रंगाचे असावे. सकाळी बारा वाजेच्या आधीचा स्वच्छ प्रकाश बेडरूम मध्ये येईल अशी रचना असावी.
……..
आजचा राहू काळ
सकाळी ७.३० ते ९.००
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.