प्रश्न – सौ कर्णिक – वधू-वरांच्या कुंडलीतील मृत्यू षडाष्टक योग म्हणजे काय?
उत्तर- कुंडली शास्त्राप्रमाणे विवाहासाठी वधु वरांची कुंडली पाहताना अष्टकूट मिलन केले जाते. हे अष्टकूट मिळून छत्तीस गुण तपासले जातात. ३६ गुणांपैकी २० ते २१ गुण जुळत असतील तर ग्रह मिलन बघितले जाते, परंतु बरेचदा वधू-वरांच्या विरुद्ध राशीमुळेमुळे अष्टकूट मिलनातून एकही गुण मिळत नाही. म्हणजे त्यांच्या राशीं चा मृत्यू षडाष्टक योग असतो. षड म्हणजे सहावी रास. अष्टक आठवी रास. मृत्यू षडाष्टक आतल्या राशी एकमेकांपासून एक तर सहाव्या नंबरवर असतात किंवा आठ नंबरवर असतात. कुंडलीतील चंद्र राशी सोबतच लग्न राशी मृत्यू षडाष्टक देखील पाहिले जाते. चंद्र राशी व लग्न राशी दोन्हीचे मृत्यू षडाष्टक असल्यास असा विवाह न करण्याबाबत ज्योतिष तज्ञांकडून सल्ला दिला. मेष×कन्या (षड), वृषभ×धनु (अष्टक), मिथुन×वृश्चिक(षड), कर्क×कुंभ (अष्टक), सिंह×मकर (षड), तुला×मिन (षड) या राशीच्या जोड्या ज्योतिष शास्त्राप्रमाणे प्रमाणे मृत्यू षडाष्टक मध्ये येतात.
उद्या प्रीती षडाष्टक योग राशीच्या जोड्या बघू.
…
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!