आजचे राशीभविष्य – सोमवार – २५ जानेवारी २०२१
मेष – ध्येय गाठाल
वृषभ – तज्ज्ञ व्यक्तींशी संवाद
मिथुन – मोसमी त्रास संभवतो
कर्क – कार्य क्षेत्रात उत्तम परिणाम मिळतील
सिंह – आरोग्याच्या तक्रारी दूर होतील
कन्या – व्यवसाय हेतूने प्रवास
तूळ – योग्य वेळी अयोग्य वेळ ओळखा
वृश्चिक – कामे मार्गी लागतील
धनु – अनपेक्षित कामे होतील
मकर – धडा शिकविण्यापेक्षा धडा घ्या
कुंभ – स्वतःला वेळ द्या
मीन – व्यवसायिक रणनीती बाळगा.
शंकासमाधान
प्रश्न- यशवंत – अनेक व्यक्तींशी माझ्याच गैरसमजातून वाद होतात. मी त्यांना धडा शिकवायचा प्रयत्न करतो. त्यातून बरी चांगली माणसे दुरावली. याचे कारण काय?
उत्तर- आपला स्वभाव दोष आपल्या स्वतःच्याच लक्षात येणे हे आपल्या प्रगतीसाठी एक सकारात्मक पाऊल आहे. आपल्या कुंडलीतील रवी, हर्षल, केतू व चंद्र यांच्या परस्पर विसंगत स्थान प्रभावामुळे बरेचदा असे घडते. अप्रगल्भ दृष्टिकोनामुळे धडा शिकवण्यापेक्षा गैरसमज न करण्याचा धडा घ्यावा. गैरसमज हे स्वभावाला नकळतपणे लागलेले दुर्धर व्यसन आहे गैरसमज हा नेहमी चांगल्या माणसाबद्दल होत असतो. यामुळे आपल्या संकुचित दृष्टिकोनामुळे कोणत्याही संकटात साथ देऊ शकणारी अशी चांगली माणसे गमावू नये. दृष्टिकोन बदला म्हणजे आयुष्य सकारात्मकरित्या बदलेल.
…
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.