आजचे राशीभविष्य – सोमवार – २८ सप्टेंबर
—
मेष – जुन्या गोष्टींचा उलगडा होईल
वृषभ- महत्त्वाच्या कामात चालढकल नको
मिथुन- वास्तुविषयक व्यवहार
कर्क- कर्ज परतफेड
सिंह- अडचणीतून मार्ग
कन्या- किरकोळ वैद्यकीय खर्च
तूळ- स्वतंत्र व्यवसायाचे प्लॅनिंग
वृश्चिक- अत्यावश्यक खरेदी
धनु- प्रमोशन
मकर- छंद जोपासा
कुंभ- धनप्राप्ती
मीन- मेहनतीला यश
…..
शंकासमाधान
प्रश्न सौ शास्त्री – माझ्या मुलीसाठी एका स्थळाशी चर्चा सुरू आहे. त्यामध्ये आम्हाला कुंडली पाहून पुढे जायचे आहे, तर मुलाकडचे याबाबत निरुत्साही आहेत. ते मुलाची जन्मतारीख जन्मवेळ देत नाही काय करावे?
उत्तर- कुंडलीतील योग बघून विवाह ठरवण्यासाठी दोन्हीकडच्या मंडळींची यासाठी तयारी आवश्यक असते. जर मुलाकडचे याबाबत निरुत्साही असतील तर त्यांना कुंडली बाबत आग्रह करू नये. याबाबत सविस्तर मार्गदर्शनासाठी आमच्या मंडळाचे “विवाह करण्यास उपयुक्त शेकडो टिप्स” या पुस्तकातून मार्गदर्शन घ्यावे व कार्यसिद्धी करावी.
प्रश्न सदावर्ते – आमची मुलगी-जावयाचा पहिलाच अधिक मास असल्याने आम्ही जावईबापूंना अधिकाचे वान घेण्यासाठी बोलावले होते. परंतु त्यांनी विनम्र नकार दिला. त्यामुळे आम्ही थोडे नाराज झालो. कसे करावे?
उत्तर- यामध्ये आपण नाराज होण्याचा प्रश्नच नाही. उलट सासरवाडीकडून मिळणारा हक्काचा अधिक मास विनम्रपणे नाकारणारा जावई आपणास मिळाला. आपले भाग्य समजा. याबाबत कोणताही किंतु परंतु अथवा गैरसमज करून घेऊ नये. चांगल्या माणसांचा चांगुलपणा समजून घेणे, हे पण महत्वाचे असते.
प्रश्न भारती- कुंडलीतील कोणता ग्रह आपल्या शरीराच्या कोणत्या अवयवाचे प्रतिनिधित्व करतो?
उत्तर – आपल्या कुंडलीत रवी हा हृदय व मणके. चंद्र -मन, डोळे, पोट. मंगळ- ऊर्जा, मांस पेशी आणि डोकं. बुध- विचार, नर्वस सिस्टम. शुक्र- गळा, किडनी, छाती. शनि- हाडे, दात, केस आणि श्वास. गुरु- लिव्हर, हातपाय. अशा
पद्धतीने कुंडलीतील विविध ग्रह आपल्या विविध अवयवांची स्थिती दर्शन याबाबत प्रतिनिधित्व करतात.
कुंडली टीप-
कुंडली तयार करायला देताना आपली जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मगाव यापैकी कोणतेही निश्चित माहिती नसताना कुंडली बनवू नये. अशावेळी हस्तरेषा, फेस रीडिंग ,भाग्यांक, डाऊझिंग या प्रकाराचा तज्ञांकडून आधार घेऊन प्रश्नांची उत्तरे मिळवावीत.
वास्तू टीप-
वास्तूमध्ये वास्तू प्रवेश तसेच अंतर्गत भागात कोणत्या प्रकारच्या गोल कमानीचा-आर्च वापर टाळावा.
डाऊझिंग टीप-
डाऊझिंग द्वारे आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवताना प्रश्नाचे स्वरूप स्पष्ट व निश्चित असावे. सतत प्रश्न बदलून नकारात्मक ऊर्जा टाळावी.
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ असल्याने शुभ कार्य टाळावीत
- पंडित दिनेश पंत
……………………
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.