आजचे राशीभविष्य – सोमवार – २१ सप्टेंबर
मेष – श्रमाचे चीज होईल
वृषभ- अपेक्षा नकोत
मिथुन- बक्षिस मिळेल
कर्क- दानधर्म होईल
सिंह- ध्येयाकडे दुर्लक्ष नको
कन्या- निसर्गात रमाल
तूळ- पाककृतींचा दिवस
वृश्चिक- धाडस नको
धनु- ऐकावे जनाचे करावे मनाचे
मकर- मौन फायद्याचे
कुंभ- शब्दाने शब्द वाढवणे
मीन- फायद्याचा सौदा
—
शंकासमाधान
प्रश्न श्री चोपडा – मला प्लॉट घ्यायचा आहे तेथे सर्व C व L आकाराचे प्लॉट आहेत कोणता घेऊ?
उत्तर- आपण EAST -C किंवा NORTH-C प्लॉट निवडावा तसेच प्लॉटची उत्तर दिशा ही ब्रह्मतत्त्वा त उभे राहून जर’ 90 अंशामध्ये येत असेल तर SOUTH EAST-L किंवा NORTH EAST-L प्लॉट आपण निवडावा.
प्रश्न सौ. विजया- कोणत्या राशीसाठी कोणता रंग शुभ मानला जातो?
उत्तर- मेष लाल व केसरी, वृषभ गुलाबी व पांढरा, मिथुन हिरवा व निळा, कर्क क्रीम व पिवळा, सिंह सोनेरी व लाल, कन्या सफेद व निळा, तूळ गुलाबी व काळा, वृश्चिक लाल व पिवळा, धनु पोपटी व निळा, मकर सफेद व निळा, कुंभ आकाशी राखडी, मीन लालबाग केशरी हे रंग शुभ आहेत.
प्रश्न श्री खैरनार – पूजेत कोणता शंख वापरावा?
उत्तर- शंखाच्या मुखा वरून मुख्यता तीन प्रकार पडतात वामावर्ती, दक्षिणावर्ती, मध्यवर्ती यातील वामावर्ती शंख हा शंखध्वनी साठी वापरला जातो. दक्षिणावर्ती शंख म्हणजेच उजवा शंख पूजेसाठी वापरला जातो व मध्यवर्ती शंख दुर्मिळ असल्याने त्याचा फारसा वापर होत नाही.
आजच्या टिप-
वास्तुमधील तुळशीला नियमित पाणी घालावे तुळस वाळू देऊ नये. बंगल्याचे बांधकाम सुरू करताना वास्तुशास्त्रातील ऊर्जा जडत्व सिद्धांतानुसार प्रथम ईशान्य उत्तर पूर्व या दिशेकडून पायाचा खड्डा घेत दक्षिण पश्चिम व शेवटी नैऋत्येकडे शेवट करावा. वास्तूच्या ब्रह्म तत्वात कधी ही अंधार ठेवू नये.
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ असल्याने शुभ कार्य टाळावीत.
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.