अनेकदा आपल्याला विविध प्रकारचा जप करावा लागतो. अशा वेळेस कोणती जपमाळ वापरावी, हा प्रश्न पडतो. जपमाळ वापरताना प्राधान्याने तुळशी माळ वापरावी. त्याखालोखाल पाच मुखी रुद्राक्ष माळ देखील जपाला चालते. या दोन्ही व्यतिरिक्त ज्या ग्रहाचा जप सांगितला असेल त्या ग्रह संबंधातील हकिक रत्नाची माळ देखील जपाला वापरण्याचा प्रघात आहे. जपाची माळ पक्क्या धाग्यामध्ये अथवा चांदीच्या तारेमध्ये गाठून घ्यावी. १०८ मण्यांची माळ बरेचदा हातात पकडण्यास सोयीस्कर होत नाही. त्यामुळे आता सत्तावीस मण्यांच्या माळा आलेल्या आहेत ती एक माळ चार वेळा जपली तर १०८ जप होतो. जप माळीला दर तर्जनी स्पर्श करू नये. त्याचप्रमाणे जपमाळ याचा मेरुमणी ओलांडू नये. अर्धवट माळ जपू नये. जपाचा उच्चार शुद्ध करावा. डोळे मिटूनच जप करावा.
…..
आजचा राहू काळ
सकाळी साडे सात ते नऊ आहे.
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!