आजचे राशीभविष्य – सोमवार – १ फेब्रुवारी २०२१
मेष – व्यापारात प्रगतीची स्थिती
वृषभ – दूरच्या कामात अडचणी
मिथुन – तणाव टाळावा
कर्क – मुलांच्या प्रगतीची बातमी
सिंह – परिचितांकडून मदत
कन्या – नोकर वर्गाला बढती
तूळ – बॉडी -माईंड मेकॅनिझम मध्ये ताळमेळ गरजेचा
वृश्चिक – कामात गर्क राहाल
धनु – अनामिक चिंता
मकर – वरिष्ठांकडून शाबासकी
कुंभ – कष्टाचे चीज होईल
मीन – किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष करावे.
……..
शंकासमाधान
प्रश्न- यशोधन – माझे फार काळ कोणाशी जमत नाही. अनेकांचे ट्रेड सिक्रेट माझ्याकडून रागाच्या भरात दुसरीकडे ओपन झालेले आहेत. त्यामुळे आता माझे खूप नुकसान झाले आहे.
उत्तर- आपल्या कुंडलीतील चंद्र राशी स्वामी शुक्र आहे. त्याचप्रमाणे चंद्र राहू व केतू यांच्या परस्पर विपरीत स्थान परिणामांमुळे आपणास हा अनुभव येत आहे. सर्वप्रथम आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की कुणाचेही ट्रेड सिक्रेट अतिशय विश्वासाने व जबाबदारीने आपणास सांगितलेले असतात. त्यामुळे त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचे मतभेद जरी झाले तरी असे ट्रेड सिक्रेट कधीही बाहेर सांगू नये. त्यामुळे त्यांची नव्हे तर आपली विश्वासार्हता संपते. नंतर आपल्याला कोणीही साथ देत नाही. ज्यांच्याकडे आपण ते सांगतो त्यांनाही त्याचे फारसे घेणे देणे नसते. मधल्या मध्ये आपली किंमत शून्य होते. जगात बाहेर जिंकण्यासारखे काही नाही. जे काही जिंकायचे आहे ते स्वतःच्या स्वभावाला, ज्याने स्वतःचा स्वभाव जिंकला त्यांनी जग जिंकले. कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवल्या नाहीत. म्हणजे अपेक्षाभंगाचे दुःख होत नाही. कारण दुःखाच्या मूळच अपेक्षा आहेत. रागाच्या भरात कोणतीही कृती करताना त्याचा भविष्यकालीन परिणामांचा विचार करून इकडचे तिकडे बोलावे. एक वार कृतज्ञ होता आले नाही तरी चालेल पण कृतघ्न होऊ नये. आपण पहाटे अमृत वेळेत उठून त्रिबंध तसेच भ्रामरी प्राणायाम नित्य पाच ते सात मिनिटे करावा. पहाटे मोकळ्या हवेत दीर्घश्वसन करावे. फार लांबचा विचार करू नये. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानावा.
…
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.