आजचे राशीभविष्य – सोमवार – १४ डिसेंबर २०२०
मेष- वरिष्ठांना सांभाळा
वृषभ- गरज असेल तरच प्रवास करा
मिथुन- तब्येतीकडे दुर्लक्ष नको
कर्क- हार्ड रिएक्शन टाळा
सिंह- शब्दांना शस्त्र बनू देऊ नका
कन्या- खिलाडूवृत्तीने टीका स्वीकारा
तूळ- रीड बिटवीन द लाईन्स
वृश्चिक- वेट अँड वॉच
धनु- पथ्यपाणी पहा
मकर- शब्द पाळा
कुंभ- कौटुंबिक ओढ
मीन- योग्य तोच सल्ला स्वीकारा.
…
शंकासमाधान
प्रश्न- बापट – कटकट किंवा खर्र खर्र आवाज वास्तुशास्त्रामध्ये नकारात्मक का सांगितला आहे?
उत्तर- आपल्या वास्तुमधील नियमित शुभ ऊर्जा WAVES कटकट अथवा कर कर अशा आवाजांनी विपरीत होतात. नियमित मध्यम OCTAVE मध्ये नसलेल्या कोणत्याही आवाज अथवा ध्वनिलहरींमुळे आपल्या मेंदूमधील उर्जा लहरी देखील विपरीत होतात. त्यामुळे अशा प्रकारचे आवाज असलेले ठिकाण आपल्याला नकोसे होते. दरवाजाचा अथवा खिडकीचा करकर आवाज बंद करावा. पक्षी देखील ज्या ठिकाणी नियमित मोठ्या आवाजाची फ्रिक्वेन्सी असते त्या ठिकाणी घरटी करत नाहीत. आपण देखील संथ लयीतील सुगम संगीत आवडीने ऐकतो, तर तार सप्तकातील ओरडून गायलेली गाणी दीर्घकाळ आवडत नाहीत. आपल्या सभोवताली असलेली शुभ ऊर्जा लहरींची कंपने विपरीत होऊ नयेत. आपल्या स्वभावावर वागण्यावर नकारात्मक परिणाम होऊ नये, त्याकरता अशा आवाजाच्या उर्जा लहरी टाळाव्यात.
…..
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे.
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.