आजचे राशीभविष्य – सोमवार – १९ ऑक्टोबर २०२०
मेष- खरेदी-विक्रीचे व्यवहार संभाळा
वृषभ- गैरसमज टाळा
मिथुन- बढतीचे योग
कर्क- छंद जोपासा
सिंह- वसुली होईल
कन्या- भावनांची गुंतागुंत
तूळ- चुकांची पुनरावृत्ती नको
वृश्चिक- ग्लॅमर मिळेल
धनु- कलावंतांना यश
मकर- स्वभाव सांभाळा
कुंभ- वास्तुविषयक निर्णय
मीन- नवीन ज्ञानार्जन
…….
शंकासमाधान
प्रश्न पद्माकर – आपल्या शरीरावरील विविध भागांवरील तीळावरून भाकीत कसे करतात?
उत्तर- हा प्रश्न शेकडो वाचकांनी आतापर्यंत विचारला आहे. शरीरावर विविध भागांवर असलेले तीळ विविध गोष्टींच्या अंदाजासाठी मार्गदर्शक ठरतात. त्यामध्ये पुढील गोष्टींचा विचार केला जातो.. तिळाचा आकार- तीळ गोल आहे, चौकोनी, त्रिकोणी, लांबट, अंडाकृती, टोकदार आकाराचा, रेघ स्वरूपात.. तिळाचा रंग- गडद काळा, भुरकट गडद, लाल, लालसर भुरकट, करडा पांढरा.. मुख्य तीळ व उपतीळ यांचे निश्चित ठिकाण…. तिळाचा आकार वाढता आहे की जैसे थे आहे. त्याचा रंग बदलतो आहे का.. खाजरा आहे का. शरीराच्या डाव्या बाजूला अथवा उजव्या बाजूला त्याचप्रमाणे शरीराचा मध्यभाग. पुढचा भाग. मागचा भाग असे ठिकाण.. त्याचप्रमाणे डोक्याच्या केसांमध्ये असलेला तीळ.. याशिवाय शरीराचे मुख्य तीन भाग COSMIC AREA..GLOBAL AREA..TELLURIC AREA यापैकी कोणत्या ठिकाणी आहे.. तसेच हातापायाच्या नखांवरील काळे- पांढरे तीळ अशाप्रकारे तिळाच्या विविध प्रकारा वरून शारीरिक, आर्थिक, मानसिक, भावनिक नातेसंबंध त्याचप्रमाणे या सर्व बाबींबाबत भविष्यकालीन ठोकताळे करता येतात. पायाचे तळवे-हाताचे पंजे यावरून देखील महत्त्वाचे ठोकताळे घेता येतात.
नवरात्र महात्म्य टीप-
नवरात्र उत्सवामध्ये घटस्थापना सोबतच अखंड नंदादीप देवी सहस्त्रनाम. सप्तशती पाठ. देवी सहस्त्रनाम जप. देवी कवच. स्त्री सूक्त पठण. देवी अथर्वशीर्ष. सप्तशती न्यास. देवी सूक्त.. दुर्गा मानस पूजा. देवी क्षमापन स्तोत्र. देवी चालीसा अर्गला स्तोत्र. कीलकम् स्तोत्र. श्री विन्ध्येश्वरी चालीसा. श्री अंबाजी महात्म्य. कुलदेवता पूजन. अशाप्रकारे जे देवी महात्म्य पाठ शक्य असतील त्याचे नियमित वाचन. नित्य सकाळ, सायंकाळ देवीची धुपारती वास्तूमध्ये करावी..
आजचा देवीच्या महावस्त्राचा रंग शुभ्रधवल पांढरा
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ असल्याने शुभकार्य टाळावीत..
—
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.