आजचे राशीभविष्य – शुक्रवार – २३ ऑक्टोबर २०२०
मेष- कौटुंबिक वाद टाळावे
वृषभ- ज्येष्ठांची पाठबळ
मिथुन- फलदायी व्यवहार होईल
कर्क- शुभ संदेश
सिंह- अडकलेली कामे गतीमान होतील
कन्या- हितशत्रू सांभाळा
तूळ- READ BETWEEN
वृश्चिक- कल्पनेला भरारी द्या
धनु- शुभ कार्याचे योग
मकर- उधारी सांभाळा
कुंभ- स्पर्धक सक्रिय होतील
मीन- शब्दांच्या पलीकडले जाणा
…….
शंकासमाधान
प्रश्न- वृंदा – राशी व शारीरिक हालचाली तसेच लक्षणे यांचा परस्पर संबंध कसा आहे?
उत्तर – शारीरिक हालचाली BODY LANGUAGE व राशी यांचा बर्यापैकी निकटचा संबंध आढळतो. त्यामध्ये फक्त रास नाहीतर नक्षत्र, नाडी गण, तत्व, राशीस्वामी, नक्षत्र स्वामी यावरून देखील शरीराचे बारीकसारीक हालचालींची विविधता होत असते. त्यावरून बऱ्या प्रकारचे ठोकताळे करता येतात…. प्रत्येक राशीचा मूळ स्वभाव वागण्याची पद्धत आवड-निवड व्यक्त होण्याची पद्धत अशा अनेक गोष्टींवर राशी नक्षत्रांचा प्रभाव आढळतो… उदाहरणार्थ गुलाबजाम खाण्याचे वेळी मेष राशीची व्यक्ती केव्हा खाऊन टाकेल कळणार नाही त्यावर पुन्हा चर्चा नाही… पण वृषभ रास मात्र गुलाबजामचा लुसलुशीत खवा एकतारी पाक मुरला की नाही यावर चर्चा करत करत खाणार… मिथुन रास हा गुलाबजाम कॉस्टिंग प्रमाणे बाहेर केवढ्याला पडेल याचा अंदाज लावत असेल…. कर्क रास मनातल्या मनात खूप गुलाब जाम खाते प्रत्यक्षात मात्र वाटी वर पालथा हात असतो…. सिंह रास स्वतः खाईल इतरांच्या वाटीत 2/2 गुलाबजाम वाढून पण येईल… कन्या स्वतः खाणार नाही व तुमच्या गुलाबजामच्या वाटीला खालून बहुतेक केस आहे म्हणून शेजारच्याला खाऊ देणार नाही…. तुळ रास गुलाबजाम वाटीत वाढलाय त्या वाटी चमचा चे कौतुकच बराच वेळ करेल नंतर संपूर्ण पाक चवीचवीन संपवेल तोपर्यंत त्यांचा गुलाबजाम दुसराच कोणीतरी खाऊन जाईल….. वृश्चिक रास गुलाबजामचे कोणतीही कौतुक न करता भरपूर खाणार व गोड पदार्थ कमी खावे असा सल्ला देणार…. धनु रास इतरांना खातांना पाहूनच तृप्त होणार सगळ्यांनी मनसोक्त खाल्ले यातच समाधान मानणार…. मकर रास ज्याला गुलाबजाम नको आहेत हे पाहून त्यालाच बरोबर आग्रह करायला जाणार….. कुंभ रास पाकामध्ये लिंबू पिळून पण पूर्वी सुधारस करायचे हे प्रत्येकाला सांगणार…. मीन रास फक्त आणि फक्त गुलाब जामच खाणार बाकी मेनू खायला आज पोट जरा बरोबर नाही असा प्रत्येकाला सांगणार….. अशा कमी-अधिक पद्धतीने प्रत्येक रास विविध प्रसंगांना विविध प्रकारे ॲक्शन रिएक्शन देत असते. प्रत्येक राशीचे वागण्याचे बोलण्याचे विशिष्ट लकब असते. तज्ञ व्यक्ती अशा सवयी वरूनच संबंधित व्यक्ती कोणत्या राशीची असू शकेल याचा अंदाज करते. प्लस आणि मायनस पॉईंट हे प्रत्येक राशीच्या वागण्यामध्ये असतात.
—
वास्तू ऊर्जा टीप-
आपल्या वास्तूच्या परिसरात फुलझाडे छान फुलणे, त्यांची फुले पूर्ण क्षमतेने वाढणे, त्याचप्रमाणे फळझाडे त्यांची फळे पूर्ण क्षमतेने येणे, फुले व फळे झाडावरच न झडणे, त्याचप्रमाणे विविध प्रकारचे पक्षी फुलपाखरे आपल्या वास्तूच्या परिसरात घरटी करणे, ही पक्षांची घरटी दीर्घ काळ राहणे, मधमाशांनी पोवळे बनवणे, पक्षांना पिल्ले होणे म्हणजे प्राणी व पक्ष्यांची पुढील पिढी आपलाच वास्तू परिसरात निर्माण होणे, वाढणे या सर्व नैसर्गिक सकारात्मक घटना आहेत. त्या आपल्या वास्तू परिसरातील शुभ किंवा सकारात्मक ऊर्जेमुळे घडत असतात. त्याकरता कुटुंबात वादविवाद टाळावेत. गैरसमज टाळावेत. म्हणजे हे सर्व शुभ परिणाम पहावयास मिळतील.
आजचा रंग
आजचा देवीचा महावस्त्र रंग हिरवा..
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे
—
…………………..
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.