आजचे राशीभविष्य – शुक्रवार – ९ ऑक्टोबर
मेष- अनपेक्षित पाहुण्यांचे स्वागत
वृषभ- जुने वाद टाळा
मिथुन- चर्चा करून मोठे निर्णय घ्या
कर्क- मौनं सर्वार्थ साधनम्
सिंह- हेका सोडा
कन्या- शारीरिक पीडा
तूळ- संबंध सुधारण्याची सुरुवात
वृश्चिक- मान सन्मान
धनु- इतरांनाही बोलू द्या
मकर- आवरा सावर
कुंभ- धावपळीत दिवस जाईल
मीन- ज्येष्ठांच्या भेटीगाठी
……….
शंकासमाधान
प्रश्न – नवले- कुंडली प्रमाणे वास्तूवर देखील नवग्रहांचा प्रभाव असतो का?
उत्तर- वास्तुशास्त्राप्रमाणे नवग्रहांचा प्रभाव वास्तुच्या विविध दिशांवर असतो. उदाहरणार्थ ईशान्य दिशा वर गुरु ग्रहाचा प्रभाव असतो. पूर्व दिशेवर सूर्याचा प्रभाव असतो. अग्नेय दिशेवर शुक्राचा प्रभाव असतो. दक्षिण दिशेवर मंगळाचा प्रभाव असतो. नैऋत्य दिशेवर राहूचा प्रभाव असतो. पश्चिम दिशेवर शनीचा प्रभाव असतो. वायव्य दिशेवर चंद्राचा प्रभाव, उत्तर दिशेवर बुधाचा प्रभाव असतो. म्हणून वास्तूला ज्या ठिकाणी कट असतो OR VASTU DEFFECT त्याठिकाणच्या ग्रहाची शुभाशुभ ऊर्जा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जाणून घेऊन त्यावरील उपाय करावे.
प्रश्न – प्रमिला- राशीनुसार स्वतंत्र वास्तूला मुख्य प्रवेशद्वार घ्यावे का?
उत्तर- वास्तुशास्त्राप्रमाणे स्वतंत्र वास्तुचे मुख्य प्रवेश द्वार कोठे असावे याबाबत अतिशय सविस्तर मार्गदर्शन केलेले आढळते. त्याचप्रमाणे काही अभ्यासानुसार, राशीप्रमाणे प्रवेशद्वार असावे असाही मतप्रवाह आढळतो. त्यानुसार वास्तु धारकाच्या कुंडलीतील रवी हा सिंह, कर्क, मकर व कुंभ राशीत असता वास्तुचे मुख्य प्रवेश द्वार हे पूर्व किंवा पश्चिमेला घ्यावे. त्याचप्रमाणे रवी हा तूळ, मेष, वृश्चिक अथवा वृषभ राशीत असता घराचे मुख्यद्वार दक्षिण आता उत्तरेला घ्यावे त्याचप्रमाणे रवी हा कन्या, मीन, धनु अथवा मिथुन राशि मध्ये असता स्वतःचे घर बांधू नये तसेच वृश्चिक, मीन आणि सिंह रास यांनी पूर्व दिशेचे प्रवेशद्वार घ्यावे. कन्या कर्क आणि मकर यांनी दक्षिणाभिमुख तर धनु, तूळ आणि मिथुन यांनी पश्चिम दिशेला प्रवेशद्वार यावे.
वास्तु टीप-
तिजोरी ही आग्नेय अथवा वायव्य दिशांना ठेवू नये. प्रवेशद्वारासमोर कचराकुंडी अथवा डस्टबिन ठेवू नये.
रत्नटीप
ग्रीन परीडॉट हे रत्न तज्ज्ञांच्या सल्ल्याने कौटुंबिक शुभ ऊर्जेसाठी वापरले जाते.
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा असल्याने शुभ कार्य टाळावीत..