आजचे राशीभविष्य – शुक्रवार – २ ऑक्टोबर
मेष- उत्पन्नाची साधने वाढवा
वृषभ- अति धावपळ नको
मिथुन- नवीन कार्यास सुरुवात
कर्क- अतिउत्साहात कामे बिघडतील
सिंह- धार्मिक कार्यात पैसा खर्च होईल
कन्या- मानसिक तणाव
तूळ- ये रे माझ्या मागल्या
वृश्चिक- आर्थिक चणचण
धनु- प्रवासाचे योग
मकर- स्वतःकडे लक्ष द्या
कुंभ- सहनशक्तीची परीक्षा
मीन- ज्ञान ग्रहणाची संधी
………
शंकासमाधान
प्रश्न पोर्णिमा- आम्हाला नूतन वास्तू गृह प्रवेश करायचा आहे. कोणते नक्षत्र शुभ असते?
उत्तर- नूतन गृहप्रवेशासाठी उत्तराभाद्रपदा, उत्तराफाल्गुनी, उत्तराषाढा, रोहिणी, मृग, चित्रा, अनुराधा आणि रेवती ही नक्षत्रे शुभ आहेत.
प्रश्न मालवणकर- जन्म नक्षत्राचा आपल्या स्वभावावर प्रभाव पडतो का?
उत्तर- होय. जन्म नक्षत्राचा आपल्या स्वभावावर प्रभाव असतो. प्रत्येक नक्षत्राचे एक तत्व असते. यामध्ये पृथ्वीतत्त्व, जलतत्त्व, वायूतत्व, अग्नीतत्व यांचा समावेश आहे. आपला जन्म या नक्षत्रावर होतो. या नक्षत्राच्या तत्त्वाप्रमाणे आपल्या स्वभावाची धाटणी बनते. २७ जन्मनक्षत्र पैकी भरणी कृतिका पुष्य मघा पूर्वाफाल्गुनी पूर्वाभाद्रपदा स्वाती ही अग्नीतत्वाची नक्षत्र आहेत. अश्विनी मृग पुनर्वसु उत्तराफाल्गुनी हस्त चित्रा विशाखा ही वायुतत्वाची नक्षत्रे आहेत. रोहिणी अनुराधा जेष्ठा उत्तरा श्रवण धनिष्ठा ही पृथ्वी तत्वाची नक्षत्र आहेत. आर्द्रा अश्लेषा मूळ पूर्वाषाढा शततारका उत्तराभाद्रपदा रेवती ही जलतत्वाची नक्षत्रे आहेत.
वास्तु टिप्स-
वास्तूमध्ये दक्षिण-पश्च नैऋत्य आग्नेय वायव्य या दिशांना आरशाचा वापर टाळावा. स्वतंत्र वास्तूत ब्रह्म तत्वात टॉयलेट बाथरूम घेणे टाळावे.
रत्न टीप- एखादा रत्नाची अंगठी बनवून वापरणे शक्य नसल्यास त्याचे पेंडंट बनवून वापर करावा. फक्त रत्न जास्त दिवस जवळ बाळगू नये.
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा असल्याने शुभकार्य टाळावेत…
…………………..
पंडित दिनेश पंत
……………………
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.